जिओची मोबाईल आणि इंटरनेट सेवा खंडित

    दिनांक :15-Feb-2026
Total Views |
पुसदमध्ये तिघांवर गुन्हे दाखल

यवतमाळ, 
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे मोबाईल टॉवर बंद केल्याने, तसेच टॉवर उपकरणांची नासधूस केल्याने बहुसंख्य भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. Internet service interrupted इंटरनेट व मोबाईल ही अत्यावश्यक सेवेत मोडली जाते. त्यामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी पुसद शहर पोलिस ठाण्यात तीन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तरुण प्रताप टेक्नोक्रॅट या कंपनीशी संबंधित असून ही कंपनी मोबाईल कंपन्यांच्या टॉवर, फायबरच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करते. सध्या जिओच्या विस्कळीत झालेल्या नेटवर्क सेवेमुळे जिओचे विदर्भ आणि मराठवाड्यातील ग्राहक त्रस्त झाले असल्याची माहिती आहे.
 
 
net
 
रिलायन्स जिओ कंपनीने आपल्या टॉवर आणि फायबरच्या देखभाल व दुरुस्तीसाठी प्रताप टेक्नोक्रॅटची नेमणूक केली आहे. या कंपनीत अनेक कामगार काम करतात. प्रतापच्या देखभाल आणि दुरुस्ती करणाèया काही तंत्रज्ञ आणि कर्मचाèयांनी आपल्या मागण्यांसाठी कंपनीला वेठीस धरले. यामध्ये सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, ऑनलाईन सेवा पुरवणारे यांना अतिशय त्रास होत आहे.
प्रतापच्या कर्मचाèयांनी गेल्या 5 दिवसांत काम बंद करून जिओचे टॉवर बंद पाडले आहे. या कर्मचाèयांनी आपल्या मागण्यांसाठी असामाजिक तत्त्वांचा वापर करीत अनेक ठिकाणी टॉवर बंद केले असून मोठ्या प्रमाणात कंपनीच्या फायबरची नासधूस केली असल्याची तक्रार जिओकडून करण्यात आली आहे. 
 
 
Internet service interrupted पुसद शहर पोलिसांनी पुणे येथील प्रताप टेक्नोक्रॅट कंपनीतर्फे विजयानंद भानुदास कांबळे यांच्या तक्रारीवरून नितीन माधव वरकड, कयुम रहीम शेख आणि शंकर किसन देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नुकताच टेलिफोन सर्व्हिसेसचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये झाला असून या सेवेला नुकसान पोहोचवणे हा अक्षम्य अपराध मानला गेला आहे. असे असूनही मनमानीपणे काही समाजकंटक कर्मचारी जनतेला त्रास देत असून अशा अपप्रवृत्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.