अखेर चाहत्यांची संपणार प्रतीक्षा! जन नायकन बद्दल समोर आली मोठी अपडेट

३० एप्रिलपूर्वी रिलीज होणार नाही

    दिनांक :15-Feb-2026
Total Views |
तामिळनाडू
Jana Nayagan, तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय उर्फ थलापथी विजय यांचा शेवटचा चित्रपट म्हणून चर्चेत असलेला ‘जन नायकन’ सध्या सेन्सॉर वादामुळे अडचणीत सापडला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच निर्माण झालेल्या वादामुळे त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले असून, ३० एप्रिलपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

Jana Nayagan, Vijay last movie, 
अभिनेता विजय लवकरच Jana Nayagan,  पूर्णवेळ तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याची घोषणा यापूर्वीच झाली आहे. त्यामुळे ‘जन नायकन’ हा त्यांचा अभिनय क्षेत्रातील शेवटचा चित्रपट ठरणार असल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल विशेष उत्सुकता होती. सुरुवातीला हा चित्रपट ९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सेन्सॉर प्रमाणपत्र न मिळाल्याने त्याचे प्रदर्शन रोखले गेले.चित्रपट निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरोधात Madras High Court येथे धाव घेतली. एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाला चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या आदेशाला स्थगिती दिली. या स्थगिती आदेशाविरोधात निर्मात्यांनी Supreme Court of India येथे याचिका दाखल केली. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला.
 
 
दरम्यान, निर्मात्यांनी Central Board of Film Certification (CBFC) विरोधातील खटला मागे घेण्यासाठी पुन्हा मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने ती मान्य केल्यानंतर आता चित्रपटाचे पुनरावलोकन सेन्सॉर बोर्डाकडून करण्यात येणार आहे. सेन्सॉरकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच चित्रपटाच्या नव्या प्रदर्शन तारखेची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे समजते.या घडामोडींमध्ये परदेशी वितरक York Cinemas यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात ‘जन नायकन’ ३० एप्रिलपूर्वी प्रदर्शित होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, ज्यांनी आधीच तिकिटे बुक केली आहेत, त्यांनी परतफेड घेण्यासाठी संपर्क साधावा, असेही नमूद करण्यात आले आहे. नव्या प्रदर्शन तारखेसाठी तिकिट बुकिंग करताना सदस्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही या सूचनेत सांगण्यात आले आहे.
 
 
राजकीय पार्श्वभूमी आणि कथानकातील काही संवेदनशील बाबींमुळे चित्रपट वादात सापडल्याची चर्चा आहे. विजय यांच्या राजकीय प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने नव्हे, तर राजकीय संदेशाच्या दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. त्यामुळे सेन्सॉर प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता सेन्सॉर बोर्डाच्या अंतिम निर्णयानंतरच ‘जन नायकन’चा मार्ग मोकळा होणार आहे. विजय यांच्या चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचा अखेरचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.