नीरा (ता. पुरंदर)
house burglary परिसरात शुक्रवारी संध्याकाळी घरफोडीची धक्कादायक घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उत्तम किसनराव आगवणे यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि तब्बल १२ लाख ६२ हजार ७६० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ६९ वर्षीय उत्तम किसनराव आगवणे नीरा येथे पेट्रोल पंप आणि चप्पल दुकान चालवतात. शुक्रवारी दि. १३ रोजी संध्याकाळी सुमारे ७ ते ९ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला.चोरट्यांनी पेट्रोल पंपातील डिझेल-पेट्रोल विक्रीचे ५ लाख ३७ हजार ७६० रुपये, कार्यालय व चप्पल दुकानातील १ लाख ५० हजार रुपये, तसेच सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, चैन, अंगठ्या व कानातील टॉप्स असा एकूण १२ लाख ६२ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल चोरीला नेला.या घरफोडीच्या घटनेचा तपास प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सर्जेराव पुजारी करीत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
घटनेनंतर नीरा परिसरात house burglary भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना घरांची सुरक्षा वाढवण्याचे आणि शेजारील परिसरात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी घराबाहेर असताना सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलीसांना कळवावे, असे पोलिसांनी सांगितले आहे.या प्रकाराने स्थानिकांमध्ये सुरक्षा प्रश्नांवर चर्चेला वेग दिला असून, पोलीस प्रशासन ही घटना लवकरच उकलून आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.