मुंबई
O Romeo box office collection व्हॅलेंटाईन सप्ताहात प्रदर्शित झालेला O Romeo हा चित्रपट येताच चर्चेत आला असून, दुसऱ्याच दिवशी त्याने बॉक्स ऑफिसवर जोरदार झेप घेतली आहे. Nadiadwala Grandson Entertainmentच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत शनिवारी लक्षणीय वाढ नोंदवली. परिणामी, सध्या थिएटरमध्ये असलेल्या Border 2 आणि Mardaani 3 यांच्या कमाईवर त्याचा स्पष्ट परिणाम दिसून आला आहे.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, Shahid Kapoor आणि Triptii Dimri यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘ओ रोमियो’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ८.५ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी उडी घेत १२.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. देशभरात ४,७४७ शोसह प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची सरासरी ऑक्युपेन्सी १९.३ टक्के होती. दोन दिवसांत चित्रपटाने भारतात २०.७५ कोटींची कमाई केली असून, जागतिक स्तरावर हा आकडा २६.६ कोटींवर पोहोचला आहे.
शुक्रवारी O Romeo box office collection एकूण १४.८६ टक्के ऑक्युपेन्सीसह सुरुवात झालेल्या या चित्रपटाच्या सकाळच्या शोजना ८.६३ टक्के प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत हा आकडा १२.१७ टक्क्यांवर पोहोचला, तर संध्याकाळच्या सत्रात १३.६६ टक्के उपस्थिती नोंदली गेली. मात्र, रात्रीच्या शोजना सर्वाधिक २४.९७ टक्के प्रेक्षकांनी प्रतिसाद दिल्याने चित्रपटाला मोठी चालना मिळाली.तथापि, शाहिद कपूरचा हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट ठरलेल्या Kabir Singhच्या कमाईला मागे टाकू शकलेला नाही. Sandeep Reddy Vanga दिग्दर्शित ‘कबीर सिंग’ने २०१९ मध्ये दुसऱ्याच दिवशी २२.७१ कोटींची कमाई केली होती. तरीही ‘ओ रोमियो’ने इतर समकालीन चित्रपटांना मागे टाकत चांगली आघाडी घेतली आहे.दरम्यान, Sunny Deol अभिनीत ‘बॉर्डर २’ने २३ व्या दिवशी १.९ कोटींची कमाई केली असून, २३ दिवसांनंतर त्याची एकूण भारतीय कमाई ३२०.४५ कोटींवर पोहोचली आहे. चित्रपटाने पहिल्या दहा दिवसांत दुहेरी आकड्यांची कमाई करत मजबूत पाया रचला होता. चौथ्या आठवड्यात प्रवेश करूनही तो स्थिर कमाई करत आहे.
दुसरीकडे, Rani Mukerji यांच्या ‘मर्दानी ३’ने प्रदर्शनाचे दोन आठवडे पूर्ण केले आहेत. सुरुवातीला संथ गतीने चाललेल्या या चित्रपटाच्या कमाईत व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने काहीशी वाढ झाली. १६ व्या दिवशी चित्रपटाने १.६५ कोटींची कमाई केली असून, एकूण भारतीय गल्ला ४३.१५ कोटींवर पोहोचला आहे. जागतिक स्तरावर त्याची कमाई ६३.९५ कोटी इतकी झाली आहे.
एकंदरीत, ‘ओ रोमियो’ने दुसऱ्या दिवशी घेतलेल्या झेपेमुळे बॉक्स ऑफिसवरील समीकरणे बदलली आहेत. येत्या आठवड्यातील कमाईवरूनच या तिन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट दीर्घकालीन शर्यतीत आघाडी राखतो, हे स्पष्ट होणार आहे. सध्या तरी ‘ओ रोमियो’ने प्रेक्षकांचा कल आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले आहे.