मुंबई उच्च न्यायालयाने पलाश मुच्छलला दिला दिलासा

15 Feb 2026 12:37:46
मुंबई
Palash Muchhal, प्रसिद्ध गायक पलाश मुच्छल गेल्या काही काळापासून चर्चा केंद्रस्थानी आहेत. भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना सोबतच्या वैवाहिक संबंधाच्या तुटण्यानंतर गायकाबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर स्मृतीच्या मित्र विज्ञान माने यांनी काही दिवसांपूर्वी पलाशवर फसवणुकीचे आरोप केले होते आणि त्यांच्याबाबत अनेक टिप्पण्या देखील केल्या होत्या.
 

Palash Muchhal,  
यावर पलाशने विज्ञान माने विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पलाशला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने विज्ञान मानेला पलाशविरुद्ध कोणतीही सार्वजनिक टिप्पणी करण्यास सक्त मनाई केली आहे. न्यायालयाच्या ह्या आदेशामुळे पलाशची प्रतिष्ठा धोक्यात येऊ नये, असे मानले गेले आहे.पलाशचे वकील श्रेयांश आर. मिठारे यांनी या निर्णयाची माहिती दिली आणि सांगितले की या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ मार्च रोजी होणार आहे.
सांगली पोलिस ठाण्यात विज्ञान माने यांनी पलाशविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी म्हटले की ५ डिसेंबर २०२३ रोजी त्यांनी पलाशला 'नजारिया' या प्रोजेक्टमध्ये निर्माता म्हणून गुंतवणूक करण्याची संधी दिली होती. त्यासाठी त्यांनी एकूण ४० लाख रुपये दिले, मात्र हा प्रकल्प पूर्ण झाला नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत. शिवाय, विज्ञानने स्मृती मंधाना आणि पलाशच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित घटनांवरही भाष्य केले आणि पलाशने तिची फसवणूक केली असल्याचे दाखवले.
यावर पलाशने स्वतःच्या बचावात विज्ञानच्या खोट्या आरोपांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती शेअर करत म्हटले की, त्यांच्या वकिलांनी विज्ञान मानेच्या खोट्या आरोपांसाठी १० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्याची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.या निर्णयामुळे पलाशच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे.
Powered By Sangraha 9.0