मुंबई,
Ranbir Kapoor, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता Ranbir Kapoor सध्या त्याच्या दोन मोठ्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. ‘रामायण भाग १’ आणि ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटांची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यापैकी ‘रामायण भाग १’ यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असताना ‘लव्ह अँड वॉर’च्या प्रदर्शन तारखेबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
अलीकडेच इन्स्टाग्रामवरील लाईव्ह सत्रात रणबीर कपूरने ‘लव्ह अँड वॉर’ पुढे ढकलण्यात आल्याची पुष्टी केली. चित्रपटाची नेमकी नवी रिलीज तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी हा चित्रपट ‘रामायण भाग १’नंतरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. त्यामुळे हा चित्रपट डिसेंबर २०२६मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ‘लव्ह अँड वॉर’च्या पुढे Ranbir Kapoor, ढकललेल्या प्रदर्शनामुळे मोठी बॉक्स ऑफिस टक्कर टळली आहे. हा चित्रपट आता दक्षिणेतील सुपरस्टार Yash याच्या ‘टॉक्सिक’ आणि Ranveer Singh अभिनीत ‘धुरंधर २’सोबत एकाच दिवशी प्रदर्शित होणार नाही. ‘टॉक्सिक’ आणि ‘धुरंधर २’ हे दोन्ही चित्रपट १९ मार्च रोजी रिलीज होणार आहेत.दिग्दर्शक Geetu Mohandas यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘टॉक्सिक’ हा चित्रपट विशेष चर्चेत आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’च्या यशानंतर यश मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याने या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दुसरीकडे, रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाने जागतिक स्तरावर १३०० कोटींहून अधिक कमाई केल्याने त्याच्या सिक्वेलकडेही चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.एकूणच, ‘लव्ह अँड वॉर’ पुढे ढकलल्याने बॉक्स ऑफिसवरील संभाव्य मोठी टक्कर टळली असली तरी येत्या काळात प्रेक्षकांना अनेक बिग बजेट चित्रपटांची मेजवानी मिळणार हे निश्चित आहे. रणबीर कपूरच्या आगामी प्रकल्पांमुळे बॉलिवूडमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.