मुंबई,
India-Pakistan T20 कोलंबो येथे होणाऱ्या टी20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील २७व्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा तणावपूर्ण झाले आहे. या सामन्याला क्रिकेटप्रेमी प्रचंड उत्सुकतेने पाहत आहेत, पण शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामन्याच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले की, “भारत-पाकिस्तान सामना म्हणजे भाजपचा खेळ आहे.”
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आरोप केला की, एकीकडे भाजप टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून राजकारण करत आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट सामन्यांद्वारे सट्टेबाजीच्या माध्यमातून शेकडो कोटींची कमाई करत आहे. राऊत म्हणाले, “भारत पाकिस्तान सामना आम्ही पाहतच नाही. निवडणुका आल्या की भारत-पाकिस्तान, हिंदू-मुसलमान, राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती लोकांना शिकवायची आणि त्यावर मत मिळवायची, पण जेव्हा पैशांचा विषय येतो, तेव्हा जय शाहांना परवानगी दिली जाते. जय शाह हे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र आहेत.”
संजय राऊतांनी देवेंद्र India-Pakistan T20 फडणवीस यांवरही निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, “काल देवेंद्र फडणवीसांनी टिपू सुलतानवर भाष्य केले, पण पाकिस्तानमध्ये त्याला हिरो मानलं जातं. मग अशा देशाबरोबर जर भारत क्रिकेट खेळत असेल, तर फडणवीसांनी निषेध करायला हवा, पण ते करत नाहीत कारण या क्रिकेटमधून सर्वांना पैसे मिळतात.” राऊतांच्या म्हणण्यानुसार मागील सामन्यात पाकिस्तानकडे सट्टेबाजीद्वारे २५ हजार कोटी रुपये गेले आहेत, आणि यंदा त्याहून अधिक रक्कम जाण्याची शक्यता आहे.त्यांनी पुढे आरोप केला की, “भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टेबाजी केली जाते आणि या पैशाचा काही भाग सरकारमधील काही लोकांपर्यंत पोहोचतो. हा पैसा पुलवामा, पहलगामसारख्या ठिकाणी जातो. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्याकडून या ढोंग उघडे पडतो. भाजपने यावर निषेध केला पाहिजे, पण एकही नेता पाकिस्तानसोबत खेळू नका असे सांगत नाही.”संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे आगामी भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला नवीन उभारणी मिळाली आहे. या सामन्याचे आयोजन आणि त्यासोबत जोडलेल्या सट्टेबाजीच्या आरोपांमुळे क्रिकेटसह राजकारणाच्या मधोमध तणाव वाढला आहे.