बारामती,
Sunetra Pawar, first public hearing दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील ‘सहयोग’ निवासस्थानी पहिला जनता दरबार शनिवारी (दि. १४) पार पाडला. या दरबारात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली.
सुरुवातीला उपमुख्यमंत्री पवार यांची प्रांताधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, तहसीलदार स्वप्नील रावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अमोल पवार आदी अधिकाऱ्यांसमवेत ‘सहयोग’ निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत बारामतीशी संबंधित अडचणी आणि चालू प्रकल्पांची माहिती घेण्यात आली.
यानंतर जनता दरबाराला Sunetra Pawar, first public hearing सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रमाणेच नागरिकांच्या समस्या ऐकण्यास प्राधान्य दिले आणि स्वतःचे दु:ख बाजूला ठेवून काम केले. दरबारात सर्वप्रथम जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी भेट घेतली. दिव्यांगांच्या घरकुलाच्या समस्येबाबत त्यांनी ‘अजितदादां’नी दिलेल्या आश्वासनाची आठवण उपमुख्यमंत्री यांना करून दिली, ज्यावर सुनेत्रा पवार यांनी संबंधित प्रश्नांचा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
जनता दरबारात उपस्थितांच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांबाबत माहिती घेऊन, उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच, राष्ट्रवादी परिवाराच्या सदस्यांशी चर्चा करून पक्षकार्याचा आढावा घेतला आणि नागरिकांच्या भावना जाणून घेऊन आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. काही प्रश्नांवर तर त्यांनी जागेवरच तोडगा काढल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांतील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचीही भेट घेतली. या वेळी इंदापूर तालुक्यातून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आदींचा समावेश होता.
या पहिल्या जनता दरबारातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील नागरिकांना जवळून ऐकून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रत्यक्ष दाखवले.