मेळघाटात प्रथमच बकर्‍यांची शर्यत

17 Feb 2026 22:11:36
दहेंडावाल्यांचा मनोरंजनाचा नवा अविष्कार
धारणी, 
Goat - Goat race ग्रामीण भागात मनोरंजनाचे अनेक प्रकार वापरले जातात. आतापर्यंत आपण पाड्यांची टक्कर, कोंबड्यांची झूंज, बैलाचे शंकरपट पाहिले व ऐकले असावे पण मेळघाटच्या दहेंडा गावात बोकड्यांच्या शर्यतीचा अभिनव प्रयोग करुन ग्रामस्थांनी मनोरंजनाचा नवा अविष्कार यशस्वी केलेला आहे.
 
 
bds;d
 
Goat - Goat race बकर्‍यांच्या शर्यतीसाठी शंकर पटातील रिंगी, छकडा उपयोगी नसतो कारण, बकर्‍यांचा आकार लहान असतो. या समस्येच्या समाधानासाठी ग्रामस्थांनी छोटी गाडी तयार केल्याने बकरापट यशस्वी करण्यात आला. पाळीव बकर्‍यांना पंधरा दिवसापासून पौष्टीक पदार्थ खाऊ घातले. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. धारणी जवळच्या दहेंडा गावात नवा अविष्कार पाहण्यासाठी हजारो दर्शक उपस्थित होते. प्रथम बक्षीस खार्‍या, द्वितीय सालई तर तिसरे पुरस्कार आयोजक गाव दहेंडाने प्राप्त केले. शिवरात्री जत्रेच्या निमित्ताने हे आयोजन होते. सातपुड्याच्या टेंभरूगड नावाच्या पर्वताच्या पायथ्याशी झालेल्या या बकर्‍याच्या स्पर्धेत अनेक बकरे धावले. लोकपरंपरांचे जतन व मनोरंजन असा दुहेरी संगम होता.
Powered By Sangraha 9.0