शिवप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी...रायगड दोरमार्ग बंद!

17 Feb 2026 11:29:14
पुणे,
Raigad toll road closed छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा साक्षीदार असलेल्या रायगड किल्ला येथे जाण्यासाठीची दोरमार्ग सेवा काही दिवसांसाठी स्थगित ठेवण्यात येणार आहे. वार्षिक तपासणी आणि आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेतल्यामुळे २३ ते २८ फेब्रुवारी या सहा दिवसांत ही सेवा पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
 
 

raigad ropeway 
या काळात किल्ल्यावर भेट देण्याचा बेत आखणाऱ्या पर्यटकांना तसेच शिवप्रेमींना काही प्रमाणात अडचण भासण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नियमित देखभाल अत्यावश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत संबंधित प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना पूर्वसूचना दिली आहे.
Powered By Sangraha 9.0