जिल्ह्यातील ७.५९ लाख शेतकर्यांवर २३०५ कोटींचे कर्ज
18 Feb 2026 20:20:16
वर्धा,
farmer-loan-in-wardha विधानसभा निवडणुकीदरम्यान सरकारने शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती. त्या अनुशंगाने कर्ज थकबाकीदार शेतकर्यांची यादी सरकारने मागविली आहे. ३० डिसेंबर २०२५ पर्यंत जिल्ह्यातील ७ लाख ५९ हजार ८५८ शेतकर्यांवर २ हजार ३०५ कोटी ४७ लाख रुपयांचे कर्ज असून ३० जून २०२६ पूर्वी त्यांची कर्जमाफी करता येईल का, यावर सरकार काम करीत असून या निर्णयाकडे आता शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
मागील काही वर्षांपासून शेतकर्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, त्यातच रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी पूर्णत: मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांवर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे. बी-बियाणे, खतांचे वाढते दर आता शेतकर्यांना परवडणारे राहिले नाही. मजुरांची मजुरीही वाढत असून लावलेला पैसाही शेतकर्यांच्या पदरी पडत नाही. त्यामुळे शेतकर्यांना रबी, खरीप आणि विविध कृषी आधारित उद्योगांकरिता बँकांकडून कर्ज उचलावे लागते. बँकांचे कर्ज भरण्यास शेतकरी असमर्थ राहिला आहे. farmer-loan-in-wardha दरम्यान, २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत सरकारने शेतकर्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती. मागील दोन वर्षांपासून शेतकर्यांना निराशाच हाती लागली. यावर्षी खरीपासह रबीही हातून गेला. दरम्यान, ३० जून पूर्वी कर्जमाफीचा निर्णय होण्याची शयता वर्तविण्यात येत आहे. खरीप, रबी हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ६२८ शेतकर्यांकडे २ हजार १६ कोटी ४८ लाख रुपये थकीत आहेत. तर विविध कृषी उद्योग व विविध योजनेंतर्गत ६ लाख १८ हजार २३० शेतकर्यांनी २८८ कोटी ९९ लाख रुपये असे २ हजार ३०५ कोटी ४७ लाखांचे कर्ज थकीत आहे.