ग्रेट बकॅयार्ड बर्ड काउंटमध्ये वर्धेत ९० पक्षी प्रजातींच्या नोंदी

18 Feb 2026 16:59:34
वर्धा,
backyard bird count ग्रेट बकॅयार्ड बर्ड काउटंच्या निमित्याने वर्धा जिल्ह्यात केलेल्या पक्षी निरीक्षणात ९० पक्षी प्रजातींच्या नोंदी घेऊन त्या ईबर्ड डॉट ओआरजी या संकेत स्थळावर नोंदवण्यात आल्या. नोंदवण्यात आलेल्या पक्षी प्रजातींमध्ये जागतिक आययुसीएन या संघटनेद्वारे वर्गीकरण करण्यात आल्यानुसार असुरक्षित वर्गात मोडणारे नदी सुरय (रिव्हर टर्न), संकट समीप वर्गातील तिरंदाज (ओरिएंटल डार्टर) व पांढर्‍या मानेचा करकोचा (एशियन उल्ली-नेकेड स्टोर्क) हे आढळले.
 

backyard bird count 
 
शिकारी पक्षी मधुबाज (मोहोळघार) (ओरिएंटल हनी बझार्ड) तसेच हिवाळी स्थलांतरित राजहंस (बार हेडेड गुज), चक्रवाक (रुडी शेलडक), काळा थिरथिरा (ब्लॅक रेडस्टार्ट), हिरवट वटवट्या (ग्रीनीश वार्ब्लर) तसेच पिवळा (वेस्टर्न यलो वॅगटेल), छोटा कंठेरी चिखल्या (लिटील रिंग प्लोवर), मोठ्या संख्येने छोटा आर्ली (स्मॉल प्रॅटीनकोल), माळ भिंगरी (बार्न स्वॅलो), लाल पुठ्ठ्याची भिंगरी (इस्टर्न रेड-रुम्पड श्वालो) व पिवळ्या कंठाची चिमणी हे प्रामुख्याने आढळले.backyard bird count
वर्धा शहराच्या जवळील दिग्रस तलाव, बोर व्याघ्र प्रकल्पाजवळील डोंगरगाव धरण व नवीन मोहननगर अशा विविध परिसरात महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे नागपूर विभागाचे विदर्भ समन्वयक राहुल वकारे, पवन दरणे, वन विभागाचे माजी वनपाल अशोक भानसे व ज्ञानचंद गडवानी यांनी पक्षी निरीक्षण केले.
Powered By Sangraha 9.0