बच्चू कडू पुन्हा काढणार संघर्षयात्रा

18 Feb 2026 19:47:53
चांदूरबाजार,
Bachchu Kadu सरकारने मागील व चालू वर्षाची कर्जमाफी ३० जून पर्यत जाहीर करावी, अन्यथा १ जुलैपासून राज्यभर रेल्वेरोको आंदोलन करू व त्यापूर्वी मेळघाटातील दुर्गम व दुर्लक्षित भागातील समस्येला वाचा फोडण्यासाठी १ ते ९ मार्च दरम्यान मेळघाटातील सलोना ते चिखलदरा अशी संघर्ष यात्रा काढण्यात येत असल्याची माहिती बुधवारी दिली.
 
 
Bachchu Kadu
 
चांदूरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथे त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मेळघाटातील पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे जी. राम. जी योजने अंतर्गत करण्यात यावी सोबतच चिखलदरा येथील स्कायवॉक तात्काळ पूर्ण करून त्यास बिरसा मुंडा नाव देण्यात यावे. Bachchu Kadu चुरणी स्वतंत्र तालुका निर्माण करण्यात यावा. मेळघाटातील खेडेगावांमध्ये मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. वनपट्टा व ७/१२ उतारा संदर्भात सन २००५ पूर्वी जंगलामध्ये अतिक्रमण करून शेती करणार्‍या शेतकर्‍यांची नावे ७/१२ उतार्‍यावर चढवून कायमस्वरूपी वनपट्टे देण्यात यावेत. तसेच एका ७/१२ उतार्‍यावर १५ ते २० नावे असल्यामुळे स्वतंत्र गाव नमुना ७/१२ करून प्रलंबित फेरफार पूर्ण करण्यात यावेत, जेणेकरून शेतकर्‍यांना शासकीय योजनांचा लाभ मिळू शकेल.
 
 
दुर्मिग भागात एअर अ‍ॅम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही मेळघाटातील अनेक गावात वीज पोचली नाही. Bachchu Kadu या गावात वीज उपलब्ध करून द्यावी अशा विविध मागण्यासोबत कर्जमुक्तीची राज्य सरकारला आठवण करून देण्याकरिता मेळघाटात १ ते ९ मार्च दरम्यान यात्रा काढण्यात येणार आहे.
 
शेतकर्‍यांना धोरणांचा फटका
कापूस, सोयाबीन, तुरीचे भाव पडले आहे. हमी भावानुसार शेतकर्‍यांच्या पिकाला अपेक्षित भाव मिळत नसून कापूस केंद्र बंद आहे. नाफेड अंतर्गत अजूनपर्यंत तूर, सोयाबीन यांची खरेदी नाही. Bachchu Kadu पत्रकार परिषदेला प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0