वाघोबा दिसताच बंडीचे दोन्ही बैल बिथरले; गळफास लागून दोन्ही ठार

18 Feb 2026 19:59:00
कारंजा (घा.),
both died by hanging तालुयातील पार्डी येथील शेतकरी बैल बंडी घेऊन शेतात जात असताना जंगलातील झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने बैल बंडीवर हल्ला केला. यात बंडीला जुंपलेले दोन्हीही बैल जीव वाचविण्याच्या नादात सुसाट पळाले. एका खाईत अडकले. दोन्हीही बैल गळफास लागल्याने जागीच गत प्राण झाले. तर बंडीवर असलेल्या शेतकरी किसना मरस्कोल्हे जखमी झाला. ही घटना आज १८ रोजी दुपारी ३ वाजता घडली.
 
 
vardha
 
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी ते कारंजा (घा.) या मार्गांवर रात्री सिमेंट रस्त्याचे बांधकाम जोरात सुरू असल्यामुळे वाघ व अस्वल हे वन्य प्राणी आता गावात येत आहेत. रात्री जोराच्या आवाजात वेगाने सुसाट चालणार्‍या वाहनांच्या आवाजात पाण्याच्या शोधात तलावावर ये जा करणार्‍या मार्गांवर अडथळा निर्माण झाल्याने वन्य प्राणी आता शेतात नजरेसमोरून दिसत आहे. both died by hanging आज शेतकरी किसना मरस्कोल्हे (७०) रा. पार्डी हे मुलासह शेतात बैलबंडी घेऊन जात होते. दरम्यान, जंगल व्याप्त भागात वाघ झुडपात दबा धरून हल्ला करण्याच्या बेतात होता.
 
 
बंडीला जुंपलेल्या दोन्हीही बैलांना वाघ हल्ला करणार हे लक्षात आले. वाघाने धाव घेताच दोन्हीही बैल सुसाट सैरावैरा पळत सुटले आणि एका खाईत जाऊन पडले. बैलांच्या गळाला फास लागल्याने दोन्हीही बैल जागीच गत प्राण झाले तर बंडीवरून पडलेला शेतकरी किसना मरस्कोल्हे गंभीर जखमी झाला. both died by hanging या घटनेची माहिती पार्डीचे पोलिस पाटील अरविंद चाफले, मंगेश कवारे यांनी जखमी शेतकर्‍यांना दवाखान्यात दाखल केले. पोलिस स्टेशन, वनविभाग, महसूल विभाग यांना फोन वरून माहिती दिली. वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वन्य प्राणी थेट गावाच्या शिवारात येऊन हल्ला करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मानव आणि वन्य प्राणी संघर्ष आता वाढीस लागले आहेत.
Powered By Sangraha 9.0