लोहारडोंगरी खाणीला पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध

18 Feb 2026 20:40:03
चंद्रपूर, 
lohardongri-mine ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि परिसर वाघ आणि अन्य वन्यजीवांसाठी प्रसिध्द आहे. सोबतच येथे वन्यजीव-मानव संघर्षही मोठ्या प्रमाणात आहे. अशा स्थितीत या वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात, ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील लोहारडोंगरी येथे लोह खाण प्रस्तावित आहे. ‘सनफ्लॅग’ कंपनीला ती दिली जाणार आहे. विदर्भ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमींचा या खाणीला तीव्र विरोध असून, त्यांची एक चमू या परिसरात भेट देऊन आली.
 
 
lohardongri-mine
 
ब्रहपुरी जवळील लोहारडोंगरी गावाजवळ 0.5 ते 0.6 घनतेचे जंगल असून, येथे अनेक वाघ, बिबट, अस्वल, कुत्रे, कोल्हा, लांडगा, हाईना, चितळ असे 17 प्रजाती आढळतात. सोबत पक्षांच्या, सरपटणार्‍या प्राण्यांच्या, कीटकांच्या अनेक प्रजाती आढळत असून, येथील जंगल हे निसर्ग, पर्यावरण, हवामान, वन आणि वन्यजीवासाठी अतिशय महत्वाचे आहे. टीसीपी, डब्लूआयआय आणि एनटीसीएनुसार प्रस्तावित खान क्षेत्र हे वाघांचे भ्रमणमार्ग आहेत. lohardongri-mine येथे वृक्षांच्या 43 प्रजातींचे 18024 इतके लहान मोठे वृक्ष आहेत. ते तोडले जाणार आहेत. खाणस्थळी तोडलेले जंगल त्याच परिसरात, जिल्ह्यात भ्रमणमार्गातील शेती विकत घेऊन लावणे योग्य असते. परंतु, वनविभागाने 6.49 हेक्टर जागेवर यवतमाळ जिल्ह्यातील उमरी, इजारा येथे वृक्ष लागवड करणार असल्याचे ठरले आहे.
या खाणीसाठी 13 सप्टेंबर 2019 ला महाराष्ट्र शासनाने ‘लेटर ऑफ इंटेंट’ दिले आहे. तर 2020-21 आणि 11 नोव्हेंबर 2025 ला मान्यता पत्र दिले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 23 जूनला 2022 ला लोहारडोंगरी या गावात जनसुनावणी घेतली होती. मात्र, कुणीही खाणीला फारसा विरोध केला नाही. या खाणीसाठी टीओआरने मान्यतासुद्धा दिली आहे. महाराष्ट्र वन्यजीव बोर्डानेही जानेवारी 2026 मध्ये खाणीला मान्यता दिली. पण अजून ‘एमओईफसीसी फॉरेस्ट क्लिअरन्स’ मिळालेले नाही. तसेच एनबीडब्लूएल/एनटीसीएतर्फे परवानगी दिली गेली नाही. या परवानग्या मिळाल्यास खाण सुरू करता येऊ शकेल. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. या खाणीला नागरिक, राजनेते आणि संस्थानी विरोध करावा, अशी मागणी ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे, डॉ. योगेश दुधपचारे, डॉ. सचिन वझलवार, संतोष दोरखंडे, सार्ड संस्थेचे अध्यक्ष भाविक येरगुडे आदींनी या खाणीला विरोध केला आहे.
खाणीतून काढणार 20 मिलीयन टन लोह
लोहारडोंगरी खाण ही ताडोबाच्या ‘बफर झोन’पासून 18 किलोमीटर, तर झोडाझरी अभयारण्यापासून 15.5 किलोमीटर अंतरावर आहे. ही खाण 50 वर्षासाठी दिली जाणार असून, त्याचे क्षेत्र 140,598 टीपीए इतके आहे. वन क्षेत्र कंपार्टमेंट 439 मध्ये ती स्थित असणार असून, खाणीचे क्षेत्र 35.73 हेक्टर असेल. lohardongri-mine तिची प्रोजेक्ट केटगरी ही बी-1 असून, येथे 20 मिलीयन टन लोह येथून उपलब्ध होणार आहे. लोहारडोंगरी या गावातील ही जमीन डेकडीवर असून, हा खडक 200 कोटी वर्षाच्या बेडेड हेमाटाईटपासून बनला आहे. त्यात 20 टक्के लोह आढळते. येथील लोहखनिज 44 मीटर खोलवर आहे.
वन विभागातर्फे खाणीसाठी चुकीचा अहवालः चोपणे
11 एप्रिल 2023 मध्ये डीसीएफ यांनी या खाणीसाठी जंगलाचा चुकीचा अहवाल सादर केला होता. हे जंगल रिझर्व फॉरेस्ट, इको क्लास व्हॅलू ई असून, घनता 0.5 इतकी आहे. परंतु, शेड्युल एक प्रजाती नसल्याचे तसेच राष्ट्रीय अभयारण्य, वन्यजीव अभयारण्य नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मते, येणारी खाण संरक्षित जंगलात नाही. ती वन्यजीव अभयारण्याच्या बाहेर आहे. हा भाग वाघ भ्रमंती क्षेत्र असले, तरी ते वन्यजीव भ्रमंती क्षेत्र नाही. वन विभागाचे मते पर्यावरण आणि वन्यजीव परवानगीची गरज नाही, असा चुकीचा अहवाल वनविभागाने दिल्याचा आरोप सुरेश चोपणे यांनी दिला आहे.
केवळ 36 लोकांनाच नोकर्‍या!
खाण संस्थेने, या खाणीमुळे एकूण 148 लोकांना फायदा मिळेल असे म्हटले असले, तरी केवळ 36 लोकांनाच नोकर्‍या मिळणार आहे. त्यात 20 अती शिक्षित, 10 मोठे शिक्षित, तर केवळ 10 लोक हे अडाणी लागतील. त्यामुळे गावातील एकूण 15 लोकांनाच नोकरी मिळण्याची शक्यता असल्याचे चोपणे म्हणाले.
Powered By Sangraha 9.0