कौतुकास्पद! फरहान अख्तरचा हॉलीवूडमध्ये 'मोठा टप्पा'

‘द बीटल्स’ मालिकेत पंडित रवि शंकरांची भूमिका

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Farhan Akhtar बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर आता हॉलीवूडमध्ये पदार्पण करत असून त्यांच्या करिअरमधील हा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. जागतिक कीर्तीचे सितारवादक आणि भारतरत्न सन्मानित पंडित रवि शंकर यांची भूमिका ते साकारणार आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत पाश्चात्य जगात पोहोचवण्यात पंडित रवि शंकर यांचे योगदान अनन्यसाधारण मानले जाते. त्यांच्या संगीताचा प्रभाव पाश्चात्य कलाकारांवरही पडला होता.
 
 

Farhan Akhtar
हा चित्रपट प्रकल्प The Beatles – A Four-Film Cinematic Event या महत्त्वाकांक्षी मालिकेचा भाग आहे. या मालिकेद्वारे प्रसिद्ध ब्रिटिश बँड The Beatles यांच्या संगीत प्रवासाचे चित्रण केले जाणार आहे. पंडित रवि शंकर यांच्या सहवासातून बँडचे सदस्य, विशेषतः George Harrison, भारतीय संगीताकडे आकर्षित झाले. त्यानंतर बीटल्सच्या संगीतात भारतीय सूरांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवू लागला. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर फरहान अख्तर यांची निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
या घोषणेनंतर Farhan Akhtar फरहान यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच ते इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारणार असल्याने त्यांच्या अभिनयाबाबत चर्चा रंगली आहे. संगीताच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तीचे पडद्यावर साकार करणे हे आव्हानात्मक मानले जाते.या आनंदाच्या प्रसंगी Amul India नेही आपल्या खास शैलीत फरहान यांना शुभेच्छा दिल्या. अमूलने प्रसिद्ध केलेल्या टॉपिकलमध्ये फरहान अख्तर यांना पंडित रवि शंकर यांच्यासोबत हातात सितार घेतलेले दाखवण्यात आले असून “Sitar Turn for Farhan” अशी शब्दकळा वापरण्यात आली आहे. अमूलने आपल्या अधिकृत पोस्टमध्ये नमूद केले की, अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर बीटल्सच्या बायोपिकमध्ये रवि शंकर यांची भूमिका साकारत हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
 
 
या सन्मानाने आनंदित Farhan Akhtar झालेल्या फरहान अख्तर यांनी हा टॉपिकल आपल्या सोशल मीडियावर शेअर करत अमूल टीमचे आभार मानले. आपल्या हॉलीवूड पदार्पणाचे खास पद्धतीने सेलिब्रेशन केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.दरम्यान, या प्रकल्पाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक Sam Mendes करणार आहेत. संगीताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्यायावर आधारित या मालिकेबाबत प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून, फरहान अख्तर यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला यामुळे नवे वळण मिळणार असल्याचे मानले जात आहे.