जबरी चोरीप्रकरणी एकास अटक, ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
वर्धा,
forcible-theft-case-hinganghat स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगणघाट येथील जबरी चोरीतील अट्टल चोरट्यास अटक करून त्याच्या ताब्यातून ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर यातील फरार असलेल्या चोरट्याचा पोलिस शोध घेत आहेत.
 
 
forcible-theft-case-hinganghat
 
हिंगणघाट येथील विजेंद्र देशमुख (५४) हे छोटी वणी येथे दुचाकीने डेली कलेशनसाठी गेले होते. तेथून महामार्गाने हिंगणघाटकडे येत असताना दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांची डेली कलेशनची ४५ हजार रुपये असलेली बॅग हिसकावून पळून गेले होते. तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. forcible-theft-case-hinganghat या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असताना ही चोरी भीमनगर वार्ड, हिगणघाट येथील प्रफुल्ल उर्फ चांग्या चंदनखेडे (१९) व बिडकर वार्ड हिंगणघाट येथील रोहित गोदे यांनी केली असल्याचे निष्पन्न झाले. हे दोघेही अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रफुल्ल चंदनखेडे यास टाका ग्राउंड येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून दुचाकी, रोख, मोबाईल असा ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रोहीत गोदे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू, प्रकाश लसुंते, मनोज धात्रक, हमीद शेख, शेखर डोंगरे, अमरदीप पाटील, धर्मेंद्र अकाली, महादेव सानप, विकास मुंडे, उदय सोलंकी, सायबर सेलचे गोविंद मुंडे, स्मिता महाजन, मीना कौरती यांनी केली.