पुण्यात गँगरेप करून महिलेची हत्या

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
पुणे,
gangraped and murdered in Pune पुण्यातील भारती विद्यापीठाजवळ एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक तपासात असे समजते की, आरोपींनी रात्री महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून निर्जन ठिकाणी नेले. तिथे तिला काठीने मारहाण केल्यावर एकाने तिला खाणीत ढकलून तिचा खून केला.
 
 
 
 murdered in Pune
या घटनेत तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी सीसीटीव्हीमध्ये ओळख न पटण्यासाठी रिक्षाचे हूड बदलले होते. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखेने तपास केला आणि अखेर गुन्हे शाखेने अब्दुल मोहम्मद शेख आणि सोहेल हकीक खान यांना अटक केली. पुण्यातील महिलांसंबंधी गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे शहराची कायदा सुव्यवस्था गंभीरपणे प्रश्नाखाली आली आहे. राज्याची संस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतप्ती निर्माण झाली आहे.