श्वान ‘लुसी’चा अचूक सुगावा

18 Feb 2026 20:01:40
गोंदिया,
Gondia railway station गोंदिया रेल्वे स्थानकावर श्वान पथकाच्या सतर्कतेमुळे मोठी अमली पदार्थ कारवाई उघडकीस आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान तब्बल १०.३३५ किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ५ लाख १७ हजार २५० रुपये इतकी सांगितली जाते.
 
 
gondia
 
मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास गोंदिया श्वान पथकातील पोउपनि सतिश सिरिया, श्वान हस्तक पोशि उमेश मारवाडे, शिवणकर, चालक पोलिस हवालदार येरणे यांनी अमली पदार्थ शोधक श्वान ‘लुसी’सह तपासणीसाठी रेल्वे स्थानक गाठले दरम्यान, Gondia railway station रेल्वे सुरक्षा बल गोंदिया यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गाडी क्रमांक १८१०९ टाटानगर इतवारी एक्सप्रेसच्या बी/१ कोचमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर संशयित अवस्थेत ठेवलेल्या एका ट्रॉली बॅग व एका काळ्या रंगाची कॉलेज बॅग ताब्यात घेण्यात आली.
 
 
आरपीएफचे पोउपनि दीपक कुमार, सउनि ज्योतरबाला, प्रधान आरक्षक एम. के. चौबे व प्रआ सतीश इंगळे यांच्या उपस्थितीत श्वान ‘लुसी’ला बॅगचा वास दिला असता, तिने भुंकून बसण्याच्या हालचालीतून बॅगमध्ये अमली पदार्थ असल्याचे स्पष्ट संकेत दिले. तपासणीअंती बॅगमधून १०.३३५ किलो गांजा आढळून आला. Gondia railway station या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बल गोंदिया येथे अप.क्र. १०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आरपीएफ गोंदिया करीत आहे.
Powered By Sangraha 9.0