होळी निमित्त गोंदिया-पटना विशेष रेल्वेगाडी

18 Feb 2026 17:49:57
गोंदिया,
Gondia Patna special train होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाश्यांची गर्दी लक्षात घेता दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने गोंदिया-—पटनादरम्यान विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ही होळी विशेष गाडी धावणार आहे.
 

Gondia Patna special train 
रेल्वे प्रशासनाने Gondia Patna special train दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 08861 गोंदिया—-पटना होळी स्पेशल ही गाडी 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता गोंदिया येथून सुटणार आहे. ही रेल्वेगाडी डोंगरगड, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चांपा, रायगड, झारसुगुडा, राऊरकेला, हटिया, रांची, मुरी, बोकारो स्टील सिटी, चंद्रपुरा, कतरासगड, धनबाद, चित्तरंजन, मधुपूर, जसीडीह जंक्शन, झाझा, जमुई, किऊल जंक्शन, मोकामा, बाढ, बख्तियारपूर, फतुहा व पटना साहेब मार्गे दुपारी 2.15 वाजता राजेंद्र नगर टर्मिनल येथे तर दुपारी 3 वाजता छपरा येथे पोहोचणार आहे. तसेच, रेल्वेगाडी क्रमांक 08862 ही परतीची विशेष गाडी 3 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.15 वाजता छपरा येथून सुटून वरील सर्व स्थानकांवर नियोजित थांबे घेत रात्री 11 वाजता गोंदिया येथे दाखल होणार आहे. या विशेष गाडीत एकूण 18 डबे असतील. त्यामध्ये 2 एसएलआर, 4 सामान्य, 8 स्लीपर, 3 एसी थ्री टियर आणि 1 एसी टू टियर डब्यांचा समावेश आहे. दरम्यान, प्रवाश्यांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासावी, जेणेकरून कोणतीही गैरसोय टाळता येईल असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Powered By Sangraha 9.0