नाशिक,
Igatpuri fake kulfi factory raid, अहिल्यानगरमधील भेसळयुक्त दूध प्रकरणानंतर आता नाशिक जिल्ह्यातही अन्नभेसळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Igatpuri येथील चर्च हिल परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या कुल्फी कारखान्यावर नाशिक ग्रामीण पोलिस यांनी छापा टाकून तब्बल २५०० बनावट कुल्फ्या आणि घातक केमिकल्स जप्त केले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रकारावर मोठा आघात बसला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संबंधित ठिकाणी मलाई कुल्फीच्या नावाखाली रसायनांचा वापर करून उत्पादन सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून छापा टाकण्यात आला असता, अत्यंत अस्वच्छ वातावरणात कोणताही वैध परवाना नसताना उत्पादन सुरू असल्याचे आढळले. तपासादरम्यान कुल्फी तयार करण्यासाठी दूध किंवा सायऐवजी विविध प्रकारचे ‘इसेन्स’, ‘फ्लेवर कलर्स’ आणि आरोग्यास अपायकारक रसायनांचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या तयार कुल्फ्या आणि केमिकल्सचे नमुने अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) च्या मदतीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी विनोद कुशवाह Igatpuri fake kulfi factory raid, याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,इगतपुरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वस्त दरात कुल्फी विकून नफा कमावण्याच्या उद्देशाने लोकांच्या जीवाशी खेळले जात असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.दुधाच्या वाढत्या किमती लक्षात घेता अस्सल दूध आणि मलाईपासून बनवलेली कुल्फी अत्यल्प दरात मिळणे शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे पालकांनी स्वस्त दराच्या कुल्फ्या खरेदी करताना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बाजारातील किमती आणि उत्पादनाच्या दरातील मोठी तफावत हीच भेसळीची प्रमुख खूण असल्याचे पोलिसांनी सांगितले.सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.