भारत-दक्षिण आफ्रिका लढतीत दोन भाऊ भिडणार

18 Feb 2026 16:04:07
नवी दिल्ली,
India-South Africa match T20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर 8 फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिका 22 फेब्रुवारी रोजी भिडणार आहेत. या सामन्याला वेगळाच रंग दोन्ही संघांच्या कोचिंग स्टाफमधील दोन भाव देणार आहेत. एल्बी मोर्कल आणि मोर्ने मोर्कल हे सक्खे भाऊ आहेत. एल्बी मोर्कल माजी दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर असून, सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिका संघासोबत 'स्पेशलिस्ट कंसल्टंट' म्हणून कार्यरत आहे. तर मोर्ने मोर्कल गतविजेत्या टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये गोलंदाजी कोच म्हणून काम करतो.
 
 
India-South Africa match
 
एल्बी मोर्कलने सांगितले की, आम्ही एकमेकांशी बोलत नाही आहोत. मला वाटतं की आमची आई आमच्यापेक्षा जास्त अस्वस्थ असेल. तिला द्वंद्व निर्माण होईल की कोणाला सपोर्ट करायचं – भारताला की दक्षिण आफ्रिकेला. 44 वर्षीय एल्बी मोर्कल एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जसह 2007 ते 2013 दरम्यान खेळला आणि 85 आयपीएल सामन्यांमध्ये 76 विकेट्स घेतल्या. 2007 मध्ये त्याने 147.85 स्ट्राइक रेटने 241 धावा केल्या, तर 2009 मध्ये 151.14 स्ट्राइक रेटने 198 धावा केल्या. या सामन्यात भावांमधील क्लॅश आणि त्यांच्या संघांसोबत असलेली रणनीती सामन्याला अधिकच रोमांचक बनवणार आहे.
Powered By Sangraha 9.0