दोन अवैध सावकारांच्या घरांची झाडाझडती

18 Feb 2026 18:04:01
वाशीम,
Maharashtra Cooperative सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या वाशीम तालुयातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत झडतीची कार्यवाही करण्यात आली.
 

Maharashtra Cooperative 
या कारवाईत गैरअर्जदार अनिल मुरलीधर मोरे यांचे चिखली घुले येथील निवासस्थान व सावरगाव बर्ड येथील फार्म हाऊस तसेच साहेबजी नारंग, जवाहर कॉलनी, जुनी आय.यु.डी.पी., वाशीम येथील निवासस्थानी सहकार विभाग व पोलिस विभागाच्या पथकाद्वारे १८ फेब्रुवारी २०२६ रोजी झडती घेण्यात आली. झडती दरम्यान पुढील चौकशीसाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले असून सदर प्रकरणी सावकारी कायद्यान्वये पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण कार्यवाही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक अनुज तारे तसेच अमरावती विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपनिबंधक गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली.
सदर कार्यवाहीमध्ये सहायक निबंधक (प्रशासन), अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशीम आर. आर. सावंत, सहायक निबंधक, सहकारी संस्था, मालेगाव आर. व्ही. आकुलवार, सहायक निबंधक, सहकारी संस्था, वाशीम एम. डी. कच्छवे यांच्यासह सहकार विभाग, पोलिस विभाग व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, अवैध सावकारी व्यवहार करणार्‍यांवर प्रभावी नियंत्रण व कार्यवाही करण्यासाठी त्यांनी सहकार विभागाचे जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशीम तसेच प्रत्येक तालुयातील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रारी दाखल कराव्यात. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे आवाहन सहायक निबंधक (प्रशासन) अंतर्गत सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक आर. आर. सावंत यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0