विवेक भीमनवार यांची एमपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती

18 Feb 2026 17:25:44
मुंबई,
Vivek Bhimanwa महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी वरिष्ठ आयएएस अधिकारी विवेक भिमनवार यांची नियुक्ती करण्यात आली असून बुधवारी त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुंबईतील राजभवन मुंबई येथे आयोजित छोटेखानी समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली.
 

Vivek Bhimanwa 
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रिक्त झालेल्या या घटनादत्त स्वायत्त संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भीमनवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार, भीमनवार यांची नियुक्ती पदभार स्वीकारल्यापासून सहा वर्षांसाठी किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी घडेल तोपर्यंत) लागू राहणार आहे. त्यांनी पदभार स्वीकारेपर्यंत आयोगाचे सदस्य डॉ. अभय वाघ यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.राज्य सरकारच्या विविध संवर्गातील रिक्त पदांसाठी पारदर्शक आणि वेळेवर भरती प्रक्रिया राबविण्याचे मोठे आव्हान आता नवनियुक्त अध्यक्षांसमोर असणार आहे. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा फायदा आयोगाच्या कामकाजात गती आणि Vivek Bhimanwa पारदर्शकता आणण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
 
२००९ बॅचचे ‘महाराष्ट्र कॅडर’चे आयएएस अधिकारी असलेले भीमनवार यांनी एलएलबी आणि एमएससी या पदव्या प्राप्त केल्या आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्तीपूर्वी ते राज्याचे परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते. परिवहन आयुक्त असताना मुंबई महानगर प्रदेशातील बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांविरुद्ध त्यांनी कठोर मोहीम राबवली होती. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या त्यांच्या निर्णयांची प्रशासकीय वर्तुळात विशेष दखल घेण्यात आली होती.
Powered By Sangraha 9.0