दहावी परीक्षेसाठी 'मोठा महत्त्वाचा निर्णय'

18 Feb 2026 12:02:23
मुंबई,
10th board exams आगामी २०२६ साली होणाऱ्या दहावी (SSC) बोर्ड परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी आणि निष्पक्षतेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) मोठा निर्णय घेतला आहे. २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या परीक्षेच्या आधी बाह्य परीक्षकांची अदलाबदल करून परीक्षा अधिक निष्पक्ष करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 

10th board exams  
बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या 10th board exams माहितीनुसार, यंदाच्या परीक्षेत प्रात्यक्षिक परीक्षा आणि लेखी परीक्षेत अनियमितता, विशेषतः उत्तरपत्रिकांमध्ये नक्कल किंवा इतर गैरप्रकार रोखण्यासाठी बाह्य परीक्षकांची नियुक्ती बदलण्यात येणार आहे. त्यानुसार, खासगी किंवा विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना सरकारी अनुदानित शाळांमध्ये बाह्य परीक्षक म्हणून नियुक्त केले जाईल, तर सरकारी शाळांमधील शिक्षकांना खासगी शाळांमध्ये पाठवले जाणार आहे. मंडळाने या बदलामुळे परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता वाढेल आणि विद्यार्थ्यांना खरे गुण मिळण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
 
 
बाह्य परीक्षकांच्या समिश्रणामुळे 10th board exams परीक्षा केंद्रांवरील निरीक्षण अधिक कडक होईल आणि परीक्षेतील अनियमितता रोखता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी काही परीक्षा केंद्रांवर नक्कलसह इतर गैरप्रकार समोर आले होते, ज्यामुळे हा निर्णय घेणे अनिवार्य झाले. तसेच, परीक्षा केंद्रापासून ५०० मीटरच्या आत झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून परीक्षेदरम्यान विशेष लक्ष ठेवण्यासाठी पथक नेमण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि शंकांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी दोन समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. संबंधित कायद्याअंतर्गत परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारासाठी दखलपात्र आणि अजामिनपात्र गुन्हा नोंदवता येईल.दरम्यान, दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारीपासून १८ मार्च २०२६ पर्यंत पार पडणार आहे, त्याआधी प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यांकन परीक्षा देखील याच महिन्यात आयोजित केल्या जाणार आहेत. मंडळाने सांगितले की, या निर्णयामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि विद्यार्थ्यांमध्ये बिघडलेला आत्मविश्वास आणि नीतिमत्ता पुनर्संचयित होण्यास मदत होईल.
Powered By Sangraha 9.0