मेलडी रोडचा पहिला प्रयोग: रहिवाश वैतागले, आवाजाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे

18 Feb 2026 19:09:03
मुंबई,  
melody-roads-in-mumbai मुंबईतील कोस्टल रोडवर सुरु करण्यात आलेल्या विशेष संगीत पट्ट्यांवर वाद उठला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ११ फेब्रुवारी रोजी या मेलडी रोडचे उद्घाटन करण्यात आले होते. या प्रयोगाला जगातील पाचवा आणि भारतातील पहिला असा प्रयोग मानण्यात आला. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना “जय हो” हे गाणं ऐकू येत असताना, रहिवाशांना सतत आवाजामुळे त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे.
 
melody-roads-in-mumbai
 
ब्रीच कँडी परिसरातील ६५० कुटुंबीयांनी म्हटले की सकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशीरपर्यंत गाणी वाजत असतात आणि रस्त्यावर वाहतुकीचा सतत ओघ असल्यामुळे आवाज सतत वाढतो. परिसरात शाळा आणि रुग्णालये असल्याने गाण्याचा प्रभाव अधिक जाणवतो, तसेच घरातील खिडक्या उघड्या ठेवणेही अशक्य झाले आहे. melody-roads-in-mumbai परिणामी रहिवाशांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तक्रार नोंदवली आहे.
संगीत रस्त्यांची संकल्पना पहिल्यांदा २००७ मध्ये जपानमध्ये अभियंता शिझुओ शिनोदा यांनी विकसित केली होती. melody-roads-in-mumbai त्यानंतर हंगेरी, जपान, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांमध्ये अशा प्रकारचे प्रयोग राबवले गेले आहेत. मुंबईतील हा प्रयोग भारतातील पहिला असून, रहिवाशांच्या तक्रारींमुळे त्याच्या भविष्यातील यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Powered By Sangraha 9.0