लाडक्या बहिणींना होळीला येणार खात्यात 3000 ते 6000 हजार रुपये'?

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप अनेकांच्या खात्यात जमा न झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आता जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचा मिळून ३००० रुपयांचा हप्ता एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 
फेब्रुवारी महिना संपत आला तरी जानेवारीचा हप्ता न मिळाल्याने लाभार्थी महिलांमध्ये चिंता व्यक्त होत होती. सुरुवातीला हा निधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल, अशी अपेक्षा होती; मात्र तांत्रिक अडचणी किंवा प्रशासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे वितरण लांबले. परिणामी अनेक महिलांना प्रतीक्षा करावी लागली.
 
 

शक्यता की भ्रम?
दरम्यान, राज्य सरकारकडून Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात, विशेषतः होळीपूर्वी रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.याशिवाय काही लाभार्थी महिलांना ६००० रुपयांपर्यंतची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते; मात्र केवायसी (KYC) त्रुटी किंवा आधार लिंकिंग समस्येमुळे मागील तीन ते चार हप्ते थांबले होते, त्यांना थकीत रक्कम एकत्रितपणे जमा केली जाऊ शकते. त्यामुळे चार महिन्यांचे मिळून ६००० रुपये खात्यात वर्ग होऊ शकतात.दरम्यान, हप्ता न मिळाल्यास महिलांनी आपले बँक खाते आधारशी जोडलेले आहे का आणि डीबीटी सेवा सक्रिय आहे का, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.