आता मिळणार कांदा रेशन दुकानच्या दुकानात

18 Feb 2026 14:53:30
गुहागर,
ration shops राज्यात लवकरच स्वस्त कांदा रेशन दुकानदारमार्फत उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि ग्राहकांना स्वस्त कांदा मिळावा, यासाठी कृषी मूल्य आयोगासमोर नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राज्य कृषी पणन मंडळाने कांदा पिकाचे धोरण ठरविण्यासाठी आणि उपाययोजना सुचविण्यासाठी १८ तज्ज्ञ सदस्यांची उपसमिती स्थापन केली आहे. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या या उपसमितीने काही महत्वाच्या शिफारसी केल्या आहेत.

राशन दुकान  
 
 
अहवालानुसार, २०२२-२३ आर्थिक वर्षात महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन १५,०२१ कोटी रुपये (एकूण उत्पादनाचे ५१%) इतके होते, परंतु साठवणुकीची मर्यादा नसल्यामुळे सुमारे १,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्याच वर्षी चार हजार ५२२ कोटींची निर्यात झाली, पण केंद्र सरकारच्या ५५० डॉलर एमईपी आणि ४० टक्के शुल्कामुळे निर्यातावर अंकुश लागला.
तज्ज्ञांच्या मते, कांद्याचा पुरवठा जास्त असलेल्या काळात रेशन दुकानदारमार्फत वितरण केल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे मोल मिळेल आणि गरजू लोकांना स्वस्तात कांदे उपलब्ध होतील. ही योजना विशेषतः त्या वर्गासाठी फायदेशीर ठरेल जे रेशन दुकाने वापरतात.
उपसमितीचा उद्देश कांदापिकाचे धोरण ठरविणे आणि उपाययोजना सुचविणे आहे.ration shops समिती सदस्यांकडून प्रस्ताव मंडळाकडे पाठवले जात आहेत आणि येत्या अधिवेशनात त्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0