ओबीसी महासंघाचा आंदोलन इशारा

18 Feb 2026 14:35:33
नागपूर,
OBC Federation राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मागील १० वर्षांपासून ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी दिल्ली आंदोलन, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये धरणे, निवेदनं आणि जनजागृतीचे कार्यक्रम सुरू ठेवले आहेत. यानिमित्त प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि संचालक, जनगणना यांना वारंवार निवेदनं दिली गेली.
 
OBC Federation
 
याबाबत ३० एप्रिल २०२५ रोजी केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेची घोषणा केली, आणि प्रधानमंत्री मोदींनीही याची पुष्टी केली. परंतु २२ जानेवारी २०२६ च्या राजपत्रात ३३ व्या घटकात फक्त एससी व एसटींचा उल्लेख असून ओबीसींचा उल्लेख नसल्यामुळे ओबीसी समाजात खळबळ उडाली आहे. समाजात पुन्हा विश्वासघात होईल अशी भीती निर्माण झाली आहे. OBC Federation यावरून, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि संचालक, जनगणना रजिस्टार यांना निवेदन दिले असून, केंद्र सरकारने दुरुस्ती केले नाही, तर दिल्ली येथे मोठे जनआंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.
 
या निवेदन प्रसंगी ओबीसी महासंघाचे केंद्रीय सचिव शरद वानखेडे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे, कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर, शहराध्यक्ष परमेश्वर राऊत, विदर्भ कार्याध्यक्ष शकील पटेल, गेमराज गोमासे, घनश्याम मांगे, गणेश नाखले, गणेश गडेकर, अशोक निखाडे, प्रा. खुशाल शेंडे, अशोक काकडे, अनिल शास्त्री, रामभाऊ कावडकर, मामा राऊत, बाबा ढोबळे, एकनाथ काळमेघ, सुरेश जिचकार, मंगेश वंजारी, विनोद डोंगरे, भास्कर भनारे आणि महासंघाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी “जितकी संख्या, तितकी भागीदारी” हे ठरवून कार्यक्रम यशस्वी केला.
सौजन्य: परमेश्वर राऊत, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0