ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र सहल

18 Feb 2026 16:32:08
नागपूर,
senior citizens ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर आणि अमरनगर जेष्ठ नागरिक मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ११ फेब्रुवारीला ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र सहल कौंडण्यपूर (जिल्हा अमरावती) येथे आयोजित करण्यात आली. कौंडण्यपूर हे वर्धा नदीच्या काठावर वसलेले प्राचीन तीर्थक्षेत्र असून, हे रुक्मिणीचे माहेर आणि भगवान श्रीकृष्णाचे सासर मानले जाते. या ठिकाणी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, अंबिका माता मंदिर तसेच ताम्रपाषाण युगातील ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात. विदर्भातील पंढरी म्हणून याची ओळख आहे.
 
trip
 
सहल प्रतिष्ठानचे सचिव राजूजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष देविदासजी आगरकर यांच्या प्रयत्नांनी आयोजित करण्यात आली. senior citizens सहलीमध्ये ३५ जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. सहल यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष गणपतराव निंबाळकर, अशोक सांभारे, रमेश जिल्हारे, रामदास माहुरे, डॉ. राजेश कुऱ्हाडे, राजेश्वर डगरवार, विलास वाकडे, शोभा आगरकर, गौरखेडे, रासेकर, ज्योती निंबाळकर, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0