चर्चा! जिल्हा परिषद-पंचायत समिती पदाधिकारी निवडीसाठी प्रतीक्षा

18 Feb 2026 14:41:58
पुणे,
pune zp जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर आता अध्यक्ष आणि पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरळीत होणार आहे, मात्र अद्याप त्यासाठी कोणतीही तारीख प्रशासनाकडून जाहीर झालेली नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीनंतर ११ फेब्रुवारीला नवनिर्वाचित सदस्यांची अधिसूचना जाहीर करण्यात आली होती, परंतु त्यानंतर पदाधिकारी निवडणुकीसाठी आवश्यक सर्वसाधारण सभा आणि निवडणुकीची तारीख निश्चित झालेली नाही.
 

pune zp 
प्रशासनाकडून संपूर्ण राज्यातील पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती एकाच दिवशी करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. या दृष्टिकोनातून संबंधित योजना आणि प्लॅनिंग सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल ९ फेब्रुवारीला जाहीर झाला, त्यानंतर अधिसूचना काढण्यात आली. कायद्यानुसार, जिल्हाधिकारी सभापती व पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडतात आणि पहिली सभा बोलवण्याचे अधिकारही त्यांच्याकडेच आहेत.
 
 
सामान्य परिस्थितीत, जिल्हा pune zp  परिषदेचा कालावधी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड होते. जर सदस्य मंडळाचा कार्यकाळ संपला असेल, तर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक असते; मात्र गेल्या तीन वर्षे दहा महिन्यांपासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे ही तरतूद लागू होत नाही. त्यामुळे स्वतंत्रपणे पदाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांना आखावा लागणार आहे.प्रशासनाच्या अंदाजानुसार, प्रथम पंचायत समिती पदाधिकारी आणि नंतर जिल्हा परिषद पदाधिकारी निवडले जातील. काही नवनिर्वाचित सदस्य कामांसाठी जिल्हा परिषदेत उपस्थित होत आहेत, मात्र नवीन पदाधिकारी अद्याप निवडले गेलेले नाहीत. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच दिवशी पार पडल्या असल्यामुळे सर्वसाधारण एकाच तारखेला पदाधिकारी निवडण्याचा विचारही सुरू आहे, जेणेकरून भविष्यातील निवडणुकांचे वेळापत्रकही सुरळीत राहील.पुणे जिल्ह्यातील निवडणुका प्रशासनाकडे प्रस्तावित असून, त्यानुसार फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. नागरिक आणि सदस्य दोघांनाही निवडणुकीच्या प्रक्रियेची प्रतीक्षा सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0