पुण्यात बुधवार पेठेत छापेमारी; ११ बांगलादेशी महिला ताब्यात

18 Feb 2026 15:22:59
पुणे,
Raids in Budhwar Peth in Pune पुण्यातील बुधवार पेठेतील रेड लाइट परिसरात पुणे पोलिसांनी काल रात्री मोठी छापेमारी केली. या कारवाईत कुंटणखान्यांमध्ये कार्यरत ११ महिला बांगलादेशी असल्याचे त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीतून उघड झाले. पोलिसांनी संबंधित महिलांवर तसेच कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, या महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पुण्यातील बुधवार पेठेत या प्रकारासारख्या बांगलादेशी महिलांना आणल्याच्या घटनांचा इतिहास असून, या छापेमारीत पुन्हा एकदा ११ बांगलादेशी महिला आढळल्याने पोलिसांत आणि नागरिकांत खळबळ उडाली आहे.
 

Raids in Budhwar Peth 
 
फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. पोलिस आयुक्त म्हणाले की, विविध बेकायदेशीर हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले असून, त्यानुसार ही कारवाई राबवण्यात आली. बुधवारी रात्री आम्ही एकूण २२ महिलांना ताब्यात घेतले आहे. बुधवार पेठेत अशा हालचालींना मदत करणाऱ्या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे. सर्व इमारतींची तपासणी करून बेकायदेशीर गोष्टींच्या विरोधात कारवाई केली जाईल. आवश्यक असल्यास पोलीस दलाची कारवाई अधिक वाढवली जाईल. महिला आणणाऱ्या दलालांवरही पिटा कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0