मुंबई,
Raj Thackeray-Eknath Shinde meeting आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर भेट घेतली. महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच या दोघांची व्यक्तिगत भेट झाली असून, यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली, त्यात काहीतरी आक्षेपार्ह नाही. शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तर राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत. त्यामुळे एका पक्षाचे प्रमुख दुसऱ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला भेटत असल्यावर काहीतरी अर्थ लावणे आवश्यक नाही. सुषमा अंधारे म्हणाल्या की, या भेटीमागे नक्की काही कारणं असू शकतात, पण त्यावरून मोठी राजकीय चर्चा करण्याची गरज नाही.