सेलूच्या आठवडी बाजारात राडा

18 Feb 2026 20:11:23
सेलू, 
weekly-market-in-selu शहरातील मंगळवारच्या आठवडी बाजारात नगरपंचायत प्रशासन आणि भाजी विक्रेत्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक रस्ते रिकामे करण्याची मोहीम हाती घेतल्याने संतापलेल्या विक्रेत्यांनी आपला भाजीपाला रस्त्यावर फेकून तीव्र निषेध नोंदवला.
 
 
weekly-market-in-selu
 
सेलू येथील आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरत असल्याने होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता मंगळवार १७ रोजी नगर पंचायत प्रशासन अ‍ॅशन मोडमध्ये येत कारवाई केली. सकाळी १० वाजतापासूनच मुख्याधिकारी, कर्मचारी आणि पोलिस ताफा बाजारात दाखल झाला. रस्त्यावर बसणार्‍या विक्रेत्यांना बाजार तळावरील मोकळ्या जागेत जाण्याचे आदेश देण्यात आले. विक्रेत्यांच्या मते, गेल्या आठवड्यात नगर पंचायत किंवा संबंधित ठेकेदाराकडून याबाबत कोणतीही दवंडी किंवा पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. weekly-market-in-selu अचानक झालेल्या या बदलामुळे विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. दिवसभर चाललेल्या या तणावानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विक्रेत्यांचा संयम सुटला आणि त्यांनी आपला माल रस्त्यावर फेकून प्रशासनाचा निषेध केला.

प्रशासनाने आम्हाला आधी विश्वासात घ्यायला हवे होते. अचानक आम्हाला उठवल्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया भाजी विक्रेत्यांनी व्यत केली.
Powered By Sangraha 9.0