मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे गरजेचे : प्रा. गणेश शिंदे

18 Feb 2026 20:14:36
वर्धा,
sant-gajanan-maharaj-in-wardha मुलांच्या केवळ अभ्यासावर लक्ष न देता त्यांच्यात मोठी स्वप्ने पाहण्याची जिद्द निर्माण करा. स्वप्न पाहणारी पिढीच भविष्यात बदल घडवू शकते, असे मार्गदर्शन ज्येष्ठ विचारवंत गणेश शिंदे यांनी केले. संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिन सोहळ्याचे औचित्य साधून द इवेन्ट्स, वैद्यकीय जनजागृती मंच आणि ’इंडियन रेड क्रॉस सोसायटी वर्धा यांच्या संयुत वतीने रविवार १५ रोजी व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ’मुलांना मोठी स्वप्न दाखवा’ हा व्याख्यानाचा विषय होता.
 
 
sant-gajanan-maharaj-in-wardha
 
व्याख्यानमालेचे उद्घाटन पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर वर्धेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, देवळीचे नगराध्यक्ष किरण ठाकरे, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, सुरेश पावडे, राजेंद्र गरपाळ, डॉ. अरुण पावडे, अ‍ॅड. अशोक पावडे, प्रभाकर राऊत, हाशम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री पंकज भोयर यांनी या सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमाचे कौतुक केले. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत ठसा उमटवणार्‍या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. sant-gajanan-maharaj-in-wardha यात क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करणार्‍या क्रिष्णाई राऊत आणि श्रावणी देशमुख यांचा गौरव करण्यात आला. कला क्षेत्रात लोककला आणि शाहिरी क्षेत्रातील योगदानाबद्दल शाहीर बबन येवले, महिला सक्षमीकरणात शेळीच्या दुधापासून साबण बनवून स्वावलंबनाचा आदर्श देणार्‍या एवोनिथ महिला उपजीविका गटाचा सन्मान करण्यात आला.
 
शेती प्रयोगात फळबाग क्षेत्रात आदर्श निर्माण करणार्‍या संघर्ष शेतकरी गट (गौळ) सह फार्मर कपमध्ये सातत्य राखणार्‍या वसुंधरा महिला गट रोहणा व प्रतिज्ञा महिला गट कारंजा यांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रास्ताविक वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी केले. संचालन डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी केले. sant-gajanan-maharaj-in-wardha यशस्वीतेसाठी सचिन गरपाळ, शैलेश कराळे, श्याम भेंडे, अनंत बोबडे, मोहन मिसाल, प्रशांत ठाकरे, महेश अडसुळे, मंगेश दिवटे , वैभव हाटे आणि डॉ. निखील तालहन यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्यातील नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0