sasikumar bhagat तुमचं असणं सर्व काही होतं. आयुष्यातील एक ते सुवर्ण पर्व होतं. आज सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी श्री शशिकुमार शंकरराव भगत यांचे निधन झाले. मृत्यू हे एक शाश्वत सत्य असले तरी त्यांच्या मृत्यूमुळे आमच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे शशिकुमार भगत यांचा जन्म 18 डिसेंबर 1944 साली मुक्तापूर येथे झाला त्यांना तीन मोठ्या बहिणी व तीन मोठे भाऊ होते. ते घरात सर्वांत लहान असल्यामुळे सगळ्यांचे लाडके होते दै. तरुण भारतमध्ये त्यांनी 1968 ते 2004 पर्यंत जवळपास 36 वर्षे काम केले व कार्यकारी संपादक म्हणून ते निवृत्त झालेत चित्रपटसृष्टीवरील त्यांचे लिखाण अतिशय प्रसिद्ध होते त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय देखणे, मृदुभाषी व साधे होते
भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. अप्रतिम, अत्यंत साधी व सोपी भाषा त्याला साहित्यिक वळण असे त्यांचे लिखाण होते. ते फक्त आमचेच मामा नव्हते तर बहुतांश लोक त्यांना कुमार मामा म्हणत असे स्वच्छतेची अत्यंत आवड असणारे, देखणे कर्तबगार व सरस्वतीचा वरदहस्त असणारे आमचे मामा आज आपल्यात नाहीत, हे सत्य पचवणे जरा जडच जात आहे त्यांनी 80 व्या दशकातील अनेक चित्रपट कलाकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासोबत प्रत्यक्ष भेटीचा सुवर्णयोग त्यांना मिळत असे ते 1991 साली पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. बरेच वर्ष त्यांनी तरुण भारतच्या दिवाळी अंकाची मुख्य संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली त्यातील एका अंकाला प्रथम क्रमांक मिळाला होता अनेक पुस्तकांसाठी प्रस्तावना लिहिल्या. त्यात डॉ. शेंबेकर यांच्या तसेच इकेबाना या लताताई व्यवहारे यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. दि. 3 जून 2003 रोजी जर्मनी, रशिया व स्वित्झर्लंड या तीन देशांचा दौरा आटोपून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विशेष विमान मायदेशी परत निघाले होते या विमानात अटलजी यांच्या प्रतिनिधी मंडळासोबत जे सुमारे दोन डझन पत्रकार होते त्यात तरुण भारतचे शशिकुमार भगत हेसुद्धा होते. ते जवळपास आठ दिवस अटलजींसोबत होते.sasikumar bhagat मला वाटतं की, ते त्यांच्या आयुष्यातील एक अपूर्व , चिरंतन टिकणारे व अविस्मरणीय क्षण असावेत त्यांना अटलजींची मुलाखत घेण्याची संधी मिळाली व तसेच त्यांच्यासोबत घालविलेले देवदुर्लभ क्षण म्हणजे सुवर्ण पर्वणीच असावी फक्त अटलजीच नव्हे तर दिवंगत प्रमोद महाजन हे जेव्हा भंडारा जिल्ह्यात दौऱ्यावर होते तेव्हा त्यांची सुद्धा मुलाखत मामांनी घेतली होती 1980 मध्ये बंगलोर फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांनी सत्यजित रे, यश चोप्रा व गुलजार यांची मुलाखत घेतली. संपादक असल्यामुळे विविध विषयांवर अप्रतिम असे लिखाण व सिनेसृष्टीतील दिग्गज लोकांच्या त्यांनी भेटी व मुलाखती घेतल्या त्यात गुलाम अली, सचिन पिळगावकर, स्मिता पाटील, ओम शिवपुरी, नितीन मुकेश, राजीव कपूर, वैजयंती माला, सुरेश ओबेरॉय, हेमा मालिनी इत्यादी कलावंतांचा समावेश आहे त्यांच्यासोबत त्यांचे सुंदर फोटो पण आहेत.
मामांच्या मित्रपरिवारामध्ये नागपुरातील अनेक नामवंत डॉक्टरांचा समावेश होता त्यात मेडिकलचे अधिष्ठाता स्व डॉ चौबे, स्व डॉ व्यवहारे, डॉ. बाभुळकर, डॉ. शेंबेकर, डॉ. कोलवाडकर आदींचा समावेश आहे कुमार मामा आज आपल्यात नाही, पण त्यांचे लिखाण, त्यांच्या आठवणी आपल्यासोबत सदैव राहतील यात तिळमात्र शंका नाही त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीना मामी व मुलगी केतकी, जावई जयदीप, नातू व नात आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो हीच प्रार्थना. ओम शांती शांती!
"Though you are not with us but your memories in the form of beautiful write up will be forever."
डॉ. रिता विवेक सोनटके
9422827547