उद्या महाराष्ट्रात शाळा व बँका बंद!

18 Feb 2026 15:25:26
मुंबई,
Schools and banks closed in Maharashtra महाराष्ट्रातील बँका १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बंद राहणार आहेत. राज्यातील सर्व बँका या दिवशी बंद राहणार असल्यामुळे, बँकेत काही काम असल्यास ते आजच संपवण्याचा सल्ला दिला जात आहे. बँकांसोबतच शाळांनादेखील या दिवशी सुट्टी राहणार आहे. तरीही ऑनलाइन सेवा सामान्यप्रमाणे सुरु राहतील. नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय अॅप, एनईएफटी, आरटीजीएस तसेच एटीएम सेवा नियमितपणे चालू राहतील. मात्र, कॅश डिपॉझिट, चेक क्लिअरन्स आणि इतर शाखेत जाऊन कराव्या लागणाऱ्या व्यवहारासाठी उद्या बँकेत जाणे शक्य होणार नाही.
 
 

chhatrapati shivaji 
 
फेब्रुवारी महिन्यातील बँक सुट्ट्यांची माहिती:
१९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती (महाराष्ट्र)
२० फेब्रुवारी – राज्य स्थापना दिन (मिझोराम, अरुणाचल प्रदेश)
२२ फेब्रुवारी – रविवार
२८ फेब्रुवारी – चौथा शनिवार (सर्व बँका बंद)
Powered By Sangraha 9.0