धर्मासाठी कसे जगावे हे शिवाजींनी शिकवले : शरद पोंक्षे
दिनांक :18-Feb-2026
Total Views |
आर्वी,
sharad-ponkshe छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ जयजयकार करून चालणार नाही. त्यांची नैतिकता आणि व्यवस्थापन कौशल्य स्वतःच्या आयुष्यात उतरवणे हीच खरी शिवजयंती ठरेल. धर्मासाठी कसे जगावे हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी तर धर्मासाठी कसे मरावे हे आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्याकरता देशासाठी जगा असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी केले.
स्थानिक शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त गांधी चौकात १७ रोजी सायंकाळी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधीर दिवे होते तर व्यासपिठावर उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, विवेक बिंड, वर्धा नागरी बँकेचे अध्यक्ष डॉ. विनय देशपांडे, मदत फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी याची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. पोंक्षे यांनी ’सेयुलरिझम’ आणि ’सनातन धर्म’ यावर प्रकाश टाकत हीन भावना दूर ठेवणारा तो खरा हिंदू असल्याचे सांगितले. आपण आज ताठ मानेने जगत आहोत, ते केवळ छत्रपतींमुळेच! जिजाऊंनी शिवरायांना रामायण-महाभारतातू श्रीराम, श्रीकृष्णांचे संस्कार दिले. प्रत्येकाने शिवाजी महाराजांचे चरित्र वाचावे. प्रत्येक हिंदूच्या घरात शिवचरित्र असले पाहिजे. sharad-ponkshe तेच संस्कार आपण आपल्या मुलांवर बिंबवले तरच प्रत्येक घरात शिवरायांचे प्रतिबिंब दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यत केला. आजचा संघर्ष केवळ हिंदू-मुस्लिम असा नाही. तो माणुसकी मानणारे आणि क्रूरता जोपासणारे यांच्यातील ’धर्म-अधर्म’ युद्ध असल्याचे त्यांनी ऐतिहासिक दाखल्यांसह स्पष्ट केले. प्रत्येकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अंतरंगात व आचरनात आणले तर आपले आयुष्य शुद्ध होईल असेही ते म्हणाले. शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यासाठी समितीने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पोंक्षे यांनी महाराजांचे युद्धकौशल्य, गनिमी कावा आणि अष्टप्रधान मंडळाच्या व्यवस्थापन शास्त्रावर सविस्तर विवेचन केले. त्यांच्या शैलीदार संवादफेकीने श्रोते भारावून गेले होते. सुधीर दिवे यांनी शिवराय जन्मोत्सव समितीच्या उपक्रमांचे कौतुक केले. sharad-ponkshe आजकाल उत्सवांचे स्वरूप बदलत असताना आर्वीतील तरुणांनी रोगनिदान शिबिर आणि प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करून आदर्श पायंडा पाडला आहे. अशा विधायक कामांमुळेच शिवरायांचा विचार जीवंत राहील, असे दिवे म्हणावे. प्रास्ताविक विवेक वैद्य यांनी केले. संचालन आणि आभार प्रदर्शन किशोर राऊत यांनी केले. कार्यक्रमाची सांगता अंकुश झाडे यांनी सादर केलेल्या स्वरचित कवितेने झाली.