वर्धा,
shripad-joshis-press-conference राजकीय आणि साहित्यबाह्य क्षेत्रातील व्यतींना पुढे करून विदर्भ साहित्य संघाच्या स्वायत्तेला इजा पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असून ही संस्था राजकीय दावणीला बांधण्याचा धोका निर्माण झाला आहे. राजकीय हस्तक्षेपातून विदर्भ साहित्य संघाला वाचवा, असे आवाहन विदर्भ साहित्य संघ बचाव पॅनलचे मुख्य संयोजक व अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले. स्थानिक शासकीय विश्राम गृह येथे आज १८ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार व ज्येष्ठ संपादक विनोद देशमुख, साहित्यिक संजय इंगळे तिगावकर, आदींची उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले की, विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत आता गैरसाहित्यिक आणि राजकीय पुढार्यांचा प्रवेश झाला आहे. हा प्रवेश साहित्य संघाच्या कोट्यवधीच्या भूखंडावर डोळा ठेवून असल्याचा आरोपही त्यांनी केला. ज्यांचे साहित्याशी काही देणे घेणे नाही. साहित्य त्यांचा पिंड नाही असे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. गिरीष गांधी यांचे आपले संबंध आहेत, मैत्री आहे. परंतु, संस्थेसाठी मैत्री दूर असल्याचे त्यांनी सांगितले. मनोहर म्हैसाळकर साहित्यक नव्हते. shripad-joshis-press-conference त्यालाही आपण स्वत: विरोध केला होता. परंतु, त्यांनी आपलं आयुष्य विदर्भ साहित्य संघासाठी दिले होते. त्यांच्या काळापासुनच र्हासाला सुरुवात झाली होती, असा आरोप त्यांनी केला. अध्यक्षपदाचा उमेदवार हा भाषेवा तज्ज्ञ असावा असेही ते म्हणाले. साहित्य संघ सरकार ताब्यात घेता आहे असा आरोप करून सरकारकडून मिळत असलेले अनुदान तुटपुंजी आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, दत्ता मेघे यांनी कधीही आमचा व्यती अध्यक्ष करा असे म्हटले नाही. ना. गडकरी यांनी तर पत्र काढून तसे स्पष्ट केले असल्याचे ते म्हणाले. आमच्या पॅनलने संपूर्ण विदर्भातून कार्यकारिणीसाठी सर्व बावीस उमेदवार उभे केले आहेत. साहित्य संघाची शतकातील पहिलीच निवडणूक आहे. ही निवडणूक का होते आहे याचा विचारही व्हावा असेच अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी ११ अर्ज तर सदस्यपदाच्या २२ जागांसाठी १११ अर्ज असल्याचे ते म्हणाले. विदर्भ साहित्य संघ वाचविण्यासाठी आम्ही मतदारांना आवाहन करीत आहोत. वि. सा. संघाच्या निवडणुकीच्या टपाल पद्धतीवरही त्यांनी आक्षेप नोंदवत प्राधिकृत अधिकार्याच्या हाती मतपत्रिका जाईल याची हमी काय असा सवालही त्यांनी उपस्थित करून मतदारांनी मुर्खपणा न करता पाच पैकी योग्य उमेदवारा कोण तो निवडा. साहित्य संघ ताब्यात घेण्यासाठी विशिष्ट राजकीय पक्ष कामाला लागला असल्याचा आरोपही त्यांनी केला. मतदान कसे करावयाचे आहे, या बाबत आम्ही जागृती करीत असल्याचे ते म्हणाले. संजय इंगळे तिगावकर यांनी लिहून दिलेले लेख एका उमेदवाराच्या नावाने प्रसिद्ध झाले. ज्या वृत्तपत्रात ते प्रसिद्ध झाले त्या वृत्तपत्राचे संपादकही या निवडणुकीत उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय इंगळे तिगावकर म्हणाले की, साहित्यिकच विसा संघाचा अध्यक्ष असावा अशी आपली भुमिका असल्याने आपण जोशी यांच्या सोबत जुळलो असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला ज्येष्ठ संपादक विनोद देशमुख यांच्यासह उमेदवारांची उपस्थिती होती.