महाशिवरात्री उत्साहात साजरी

18 Feb 2026 19:17:52
नागपूर,
Suraj Society New Manishnagar ग्रीनलँड, सुरज सोसायटी, न्यू मनिषनगर येथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भजन संध्या आयोजित करण्यात आली होती. भक्तिमय वातावरणात शिवभक्तांनी भजन-कीर्तनाचा आनंद घेतला. तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

did 
 
 
 
कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेवक रमेश भंडारी यांनी उपस्थित राहून नागरिकांना शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. Suraj Society New Manishnagar कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्मिता गिरी, हेमांगी थोटे, राजेश थोटे, प्रकाश धुर्वे, हेमांगी धुर्वे, रंजना जोशी, निशिकांत जोशी, श्याम गिरी, शिल्पा शर्मा, सत्य शर्मा, नंदू गिरे, अतुल डबीर, अमिता डबीर, ज्योती डाव, श्रीकांत डाऊ, गीता उंबरे, उंबरे , अंकिता अग्रवाल, गौरव अग्रवाल, स्वाती गावंडे, वृषाली किनेकर, गौरी पांडे, तांबेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
सौजन्य: प्रज्ञा जोशी,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0