वरुड रुग्णालयात तणावाचे वातावरण

18 Feb 2026 19:45:37
वरुड,
Warud Hospital शिवाई बस व ऑटोरिक्षा अपघातानंतर ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण दिसून आले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने भाडेतत्त्वावर चावविल्या जातात. या अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना २० लाखाची सानुग्रह मदत परिवहन विभागाकडून देण्यात यावी अशी मागणी विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्यांसह मृतकाच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
 
 
Warud Hospital
 
अपघातानंतर घटना स्थळावरची परिस्थिती पाहील्यावर अपघातास प्रथमदर्शनी बस चालक जबाबदार असल्याचे दिसत आहे. प्रत्यदर्शींचे तेच म्हणने आहे. Warud Hospital सामान्य नागरिकांमध्ये अपघातानंतर प्रचंड संतापाची भावना होती. रुग्णालयात खूप गर्दी जमल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता. या घटनेने परिसरात शोककळा पसरली होती. पोलिसात बसचालकाविरूद्ध तक्रार होताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस ताब्यात घेण्यात आली असून चालकाला अटक करण्यात आली.
 
 
रा. प.च्या नियमानुसार त्रयस्त वाहनातील व्यक्ती मृत पावल्याने तत्काळ मदत देता येत नाही. परंतु, अपघाताचे गांभीर्य व सविस्तर घटना बघता मृत कुटुंबीयांच्या वारसास नियमाप्रमाणे व न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन एस. टी महामंडळ विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिले. Warud Hospital अपघात मृत झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी प्रशासनाच्या वतीने प्रती व्यक्ती १० हजाराची आर्थिक मदत नातेवाईकांकडे सोपविण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0