'या' राजकीय नेत्याचा खुला पाठिंबा : द केरळ स्टोरी २

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
मुंबई,
nitesh rane २०२२ साली प्रदर्शित झालेल्या वादग्रस्त पण गाजलेल्या ‘द केरळ स्टोरी’च्या पुढील भागाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या भागाने निर्माण केलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या सिक्वेलबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
 

nitesh rane  
द केरळ स्टोरी या चित्रपटाने प्रदर्शना वेळी मोठी खळबळ उडवली होती. त्यानंतर आता द केरळ स्टोरी २: गोज बियॉन् या नावाने सादर होत असलेला दुसरा भाग अधिक व्यापक आणि गडद आशय मांडणार असल्याचे ट्रेलरमधून दिसून येते. कथानक तीन तरुणींच्या आयुष्यातील नाट्यमय घडामोडींवर आधारित असून त्यांच्या आयुष्यामागील कथित कटकारस्थानाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आल्याचे संकेत मिळतात.
या चित्रपटाला nitesh rane  राजकीय पातळीवरही पाठिंबा मिळताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर ट्रेलर शेअर करत चित्रपटाला खुला पाठिंबा दर्शवला आहे. ट्रेलर शेअर करताना त्यांनी चित्रपटातील विषय महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. समाजासमोर वास्तव मांडणाऱ्या आणि संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या कलाकृतींना पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे समर्थकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता व्यक्त केली आहे.ट्रेलर शेअर करताना त्यांनी वादग्रस्त आशयाचे कॅप्शन लिहिल्याने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. समर्थकांकडून त्यांचे समर्थन होत असले तरी काहींनी त्यांच्या वक्तव्यावर टीकाही केली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याभोवती चर्चेचे वादळ उठण्याची चिन्हे दिसत आहेत.निर्माते विपुल अमृतलाल शहा यांच्या सनशाईन पिक्चर्सच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार झाला आहे. दिग्दर्शिका कामाक्षी नारायण सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये भावनिक, थरारक आणि राजकीय छटा असलेले दृश्य प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.अशिन ए. शाह सहनिर्मित हा चित्रपट येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरनंतर निर्माण झालेल्या चर्चेमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून बॉक्स ऑफिसवर तो किती यश मिळवतो, याचीही उत्सुकता वाढली आहे.