अनिल कांबळे
नागपूर,
blackmailed प्रियकराच्या छळाला कंटाळून एका तरुणीने विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही संतापदायक घटना गराेबा मैदान परिसरात घडली. तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून लकडगंज पाेलिसांनी आराेपी तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नाेंदविला आहे. स्वयं बालपांडे (20) असे आराेपीचे नाव आहे.
पीडित 18 वर्षीय तरुणी आणि आराेपी स्वयं हे दूरचे नातेवाईक असून त्यांच्यात प्रेमसंबंध हाेते. मात्र स्वयं हा संशयी वृत्तीचा हाेता. ताे पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडत हाेता. त्यामुळे पीडितेने त्याच्याशी सर्व संबंध ताेडत दुरावा केला हाेता. यामुळे स्वयं संतापलेला हाेता. ताे सतत पीडितेला ाेन आणि व्हाॅट्सअॅपवर मॅसेज पाठवून त्रास देऊ लागला. पीडिता त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ताे तिला शिविगाळ करू लागला. तसेच तिचे खासगी ाेटाे व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत हाेता. आराेप आहे की, 14 ेब्रुवारीला आराेपीने ाेटाे डिलिट करण्याच्या बहाण्याने पीडितेला गराेबा मैदानजवळ बाेलावले. पीडिता पाेहाेचली असता स्वयंने ाेटाे डिलिट करण्यास नकार दिला. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या छळाला कंटाळून पीडितेने जीवन संपविण्याचा निर्णय घेत विष प्राशन केले. कुटुंबीयांनी तत्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. पीडितेच्या जबाबावरून पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून आराेपीचा शाेध सुरू केला आहे.