नागरिकांनो सावधान! राज्यातील हवामानात अचानक बदल

उष्णतेसह पावसाचीही शक्यता

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
पुणे,
temperature rise राज्यात आणि देशभरात हवामानाचे चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. काही भागांत अजूनही थंडीची चाहूल आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र दुपारी वाढत्या उकाड्यामुळे उन्हाळ्याचा अनुभव सुरु झाल्याची जाणीव होत असून, भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे.
 

Weather alert Maharashtra, temperature rise February 2026 
फेब्रुवारी महिन्यातच राज्यातील हवामानात मोठे चढउतार दिसून येत आहेत. उत्तरेकडील प्रदेशात अजूनही गारवा कायम असला तरी इतर भागांमध्ये सकाळी थंडी आणि दुपारी उष्णतेची विसंगत परिस्थिती जाणवते आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली होती. तापमानातील सतत बदलांमुळे नागरिक त्रस्त आहेत, तर थेट परिणाम आरोग्यावर दिसत आहेत. सर्दी, खोकला आणि इतर तक्रारी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील कमाल आणि किमान तापमानात पुढील काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. केरळमधील कोची येथे 36.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर अमरावतीमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले. या पार्श्वभूमीवर उष्णतेचा परिणाम पुढील काही दिवस अधिक जाणवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
 
उत्तर भारतातील temperature rise  हवामानातही बदल होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा येथे तापमानात चढउतार सुरू राहणार आहेत. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर सकाळच्या वेळी धुक्याचे प्रमाण वाढू शकते. विशेषत: पश्चिम उत्तर प्रदेशातील सुमारे 19 जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.मुंबईमध्येही तापमानात सतत बदल होत असून, कमाल तापमान पस्तिशीच्या खाली आहे. दादर चौपाटी परिसरात सकाळपासून आभाळ ढगाळ असते, परंतु दुपारी 12 ते 4 दरम्यान उन्हाचा तडाखा जाणवतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शहरात कमाल तापमान 32 अंश आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सोमवारी 35 अंशांवर गेलेले तापमान आता घटून 32 अंशांवर येण्याचा अंदाज आहे, तर गुरुवारपासून पुन्हा वाढ होईल.हवामानातील या अचानक बदलामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे, उन्हाळ्यात योग्य पाणी पिणे आणि थंड राहण्यासाठी योग्य उपाय करणे आवश्यक आहे, असे हवामान तज्ज्ञांनी सुचवले आहे.पुण्यातही हवामानामध्ये बदल पाहायला मिळत आहे. सकाळी ऊन तर रात्री थंडी