कोणते खाद्यतेल आणि किती वापरावे?

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
cooking oil स्वयंपाक घरात तेलाचा वापर सहज केला जातो. जेवण बनवतांना तेल हे वापरलेच . जाते, पण चुकीच्या पद्धतिने तेलाचे सेवन केल्यास शरीराला हानी होण्याची जास्त शक्यता असते.
 
 

खाद्यतेल  
 
 
शेंगदाणे तेल: सर्व प्रकारच्या चरबींचे संतुलित मिश्रण असून, नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्समुळे मुक्त रॅडिकल्स तयार होणे कमी होते. यामुळे हृदयरोगापासून संरक्षण मिळते, एलडीएल कोलेस्टेरॉल कमी आणि HDL कोलेस्टेरॉल वाढते.
तिळाचे तेल: मोनो आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडयुक्त असून नसा आणि हाडांसाठी लाभदायक आहे. याचा नियमित वापर एचडीएल कोलेस्टेरॉल वाढवतो आणि मुक्त रॅडिकल्स तयार होणे कमी करतो. तेलकट किंवा संधिवातयुक्त हवामानासाठी तिळाचे तेल अधिक योग्य आहे.
सूर्यफूल तेल: मोनो आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्ससह जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स देखील मिळतात. हे तेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
तज्ज्ञांचा सल्ला आहे की, दैनंदिन स्वयंपाकात फक्त एक तेल वापरण्याऐवजी विविध तेलांचा समावेश करा. यामुळे अन्नाची चव वाढते आणि शरीराला अधिक फायदे होतात.cooking oil तसेच तेलाचे प्रमाण संतुलित ठेवणे आणि जास्त तळणारे पदार्थ टाळणे आवश्यक आहे.
शेंगदाणे, तिळा किंवा सूर्यफूल तेल यांचा संतुलित वापर केल्यास हृदयरोगांपासून संरक्षण मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे तज्ज्ञांनी सांगितले.