विनयभंग करणाऱ्या आराेपीला 5 वर्षे सश्रम कारावास

19 Feb 2026 15:40:47
अनिल कांबळे
नागपूर, 
molestation accused घरात घुसून विनयभंग करणाऱ्या आणि अश्लील कृत्य करून महिलेचा छळ करणाऱ्या आराेपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एम.मिश्रा यांनी हा निकाल दिला.
 

विनयभंग  
 
 
आराेपी निखील दिलीप तिडके (33, नेहरू पुतळाजवळ, इतवारी) हा लकडगंज पाेलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाèया िफर्यादी महिलेला नेहमी अश्लील इशारे करून आणि फोनवरून मेसेज पाठवून त्रास देत हाेता. 27 मे 2025 राेजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास आराेपीने महिलेच्या घरात प्रवेश केला. तिथे त्याने महिलेला शिवीगाळ व धमकी देऊन जबरीने अश्लील कृत्य केले, ज्यामुळे महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून लकडगंज पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला हाेता आणि आराेपीला 27 मे 2025 राेजीच अटक करण्यात आली हाेती.molestation accused न्यायालयाने ठाेठावलेली शिक्षासाक्षी-पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने विविध कलमान्वये आराेपीला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पाेलिस उपनिरीक्षक सखाराम कांबळे यांनी केला आणि न्यायालयात दाेषाराेपपत्र सादर केले. सरकार पक्षार्ते सरकारी अभियाेक्ता अ‍ॅड. राम अनवाने यांनी बाजू मांडली. या खटल्याच्या यशस्वी निकालासाठी काेर्ट पैरवी अधिकारी पाेलिस हवादार महेश जाधव, पाेलिस अंमलदार अमाेल आणि नितीन यांनी बाजू सांभाळली.
Powered By Sangraha 9.0