रुग्णालयाच्या लढ्यात पहिल्या दिवशी पत्रांचा ढिग

19 Feb 2026 19:59:42
सिंदी (रेल्वे), 
sindhi hospital fight येथील आरोग्य केंद्राला सामान्य रुग्णालयाचा दर्जा मिळावा, यासाठी तीन दिवस रतपत्र प्रपंचाला आज प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ५१६ स्त्री-पुरुषांनी रताने पत्र लिहून एक विक्रम केला. ही पत्र टपालाने मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना सोमवारी पाठवली जाणार आहे.
 

रतपत्र  
 
 
यापूर्वी जाहीर केल्यानुसार आज गुरुवार १९ रोजी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जाणता राजाच्या प्रतिमेचे पूजन करुन सहा टेबलवरून रताने पत्र लिहण्यास नागरिकांनी झुंबड केली होती. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असंख्य लोकांनी त्यात सक्रीय सहभाग नोंदवला होता. दोन डझन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी यासाठी जनतेला सहकार्य केले.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालयासाठी बसस्थानकावर सुरू असलेल्या आंदोलनाला एकता युवा मंडळाने पूर्ण पाठिंबा दिला आहे. मंडळाचे बरेच सभासद आज आंदोलनात सहभागी झाले आहे.sindhi hospital fight अजून दोन दिवस चालणार्‍या आंदोलनातही सहभाग नोंदवणार आहे. ग्रामीण रुग्णालय सिंदीकरांसाठी व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील जनतेसाठी महत्त्वाचे असून ते मंजूर व्हायलाच पाहिजे. यासाठी होणार्‍या प्रत्येक आंदोलनाला एकता युवा मंडळाचा सक्रिय पाठिंबा राहील, असे एकता युवा मंडळाचे संघटक नरेश पेटकर यांनी यावेळी सांगितले.
Powered By Sangraha 9.0