सकल हिंदू समाज संमेलन संपन्न

19 Feb 2026 17:35:46
नागपूर,
All Hindu Society Conference खरबी नगरातील मुरली माधव नगरी, स्नेहल नगर, बहादुरा येथे शिव मंदिर, हनुमान मंदिर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने सकल हिंदू समाज संमेलन आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात गोमाता पूजन, भारत मातेची आरती व सांघिक गीताने झाली. त्यानंतर महिला मंडळाचे भजन-कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून प्रचारक श्री. निलेश गद्रे (क्षेत्रीय कार्यकारिणी सदस्य, सामाजिक समरसता, छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होते. त्यांनी हिंदू समाजातील एकता, जातिव्यवस्था निर्मूलन आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली.
 
 
hindu
 
 
मंचावर संयोजक पांडुरंग देशमुख, तुलाराम लांजेवार, मंदिर अध्यक्षा . निषा फटे, नगर संघचालक विक्रम राम उपस्थित होते. तसेच आरोग्य सभापती . नरेश नांदुरकर, महिला क्रीडा सभापती . सुधा सेलोकर, नगरसेवक बाबा बोकडे, मंगेश चाफले, राम कावडकर, गणेश माहुर्ले, राजेश दुधे, प्रभाकर चांभारे आदी मान्यवर उपस्थित होते. All Hindu Society Conference कार्यक्रमाचे संचालन . नंदू जाधव यांनी केले. महाआरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.
सौजन्य : सतीश देशपांडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0