टी-२० विश्वचषक २०२८...बांगलादेश-ऑस्ट्रेलियाची एन्ट्री!

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Bangladesh-Australia entry आयसीसी टी-२० विश्वचषक २०२८ साठी मोठ्या अपडेट्स समोर आल्या आहेत. २०२८ चा विश्वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाणार असून, यासाठी तब्बल १२ संघांची पात्रता जवळपास निश्चित झाली आहे. यजमान देश म्हणून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला थेट प्रवेश देण्यात आला आहे, तर २०२६ च्या टी-२० विश्वचषकात सुपर-८ फेरीत पोहोचलेल्या संघांनाही आपोआप पात्रता मिळणार आहे.
 
 
Bangladesh-Australia
 
यामध्ये भारत, पाकिस्तान, झिम्बाब्वे, श्रीलंका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण ९ संघांनी आपली जागा निश्चित केली आहे. उरलेल्या तीन जागांसाठी आयसीसी टी-२० रँकिंग निर्णायक ठरेल. सध्याच्या रँकिंगनुसार बांगलादेश, अफगाणिस्तान आणि आयर्लंड आघाडीवर आहेत, आणि जर रँकिंगमध्ये मोठे बदल झाले नाहीत, तर या तिन्ही संघांची निवड जवळपास पक्की समजली जात आहे. अधिकृत घोषणा ९ मार्च रोजी होईल.
 
 
 
२०२६ च्या विश्वचषकातून बाहेर राहिलेल्या बांगलादेश संघासाठी २०२८ मध्ये पुनरागमनाची संधी मिळाली आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह पसरला आहे. दुसरीकडे, २०२६ मध्ये संधी मिळालेल्या स्कॉटलंड संघाला प्रादेशिक पात्रता फेरीतून मार्ग काढावा लागू शकतो. सुपर-८ फेरीतून बाहेर पडलेला ऑस्ट्रेलिया यजमानपदाच्या जोरावर २०२८ साठी थेट प्रवेश मिळवू शकेल. आता २०२८ च्या टी-२० विश्वचषकात कोणते संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, याकडे क्रिकेटप्रेमींनी लक्ष केंद्रीत केले आहे. विश्वचषक २०२८ चा प्रवास हळूहळू आकार घेऊ लागला आहे.