व्यापारी नेता शालीग्राम टिबडीवालची गजानन महाराज देवस्थानातून हकालपट्टी

19 Feb 2026 14:16:28
वर्धा, 
shaligram tibdiwal स्थानिक गजानन महाराज देवस्थानातील चांदी प्रकरण व्यापारी नेता शालीग्राम टिबडीवाल यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी एकमताने ठराव घेऊन टिबडीवाल यांची संस्थानमधून हकालपट्टी केली आहे. संत गजानन महाराज देवस्थान संस्थेच्या कार्यकारिणीच्या सभेत महाराजांचे मुकूट करण्यासाठी चांदी खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता.
 
 

gajananmaharaj devasthan 
 
 
संस्थेचे विश्वस्त शालीग्राम टिबडीवाल यांनी एक किलो ९०० ग्रॅम चांदी सराफाजवळून परस्पर आणली. त्यांनी ती चांदी मंदिरात जमा केली नाही. यामुळे संस्थेचे पदाधिकारी त्यांच्याकडे चांदी वापस मागण्यासाठी जात होते. परंतू, ते कुठेला ना कुठले कारण सांगून त्यांना परत पाठवित होते. चांदीचा परस्पर विल्हेवाट लावण्याचा उद्देश टिबडीवाल यांचा दिसत होता. यामुळे संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे ठरविले. याची भनक टिबडीवाल यांना लागताच त्यांनी एक किलो ९०० ग्रॅम चांदी वर्षभरानंतर मंदिरात परत केली. हे कृत्य संस्थाविरोधी असल्याने व गजानन महाराज भतांच्या भावना दुखावणारे आहे. कार्यकारिणी मंडळाच्या सभेत बहुमताने शालीग्राम टिबडीवाल यांना संस्थेच्या कार्यकारिणी मंडळातून काढून टाकण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला व त्यांची हकालपट्टी केली.shaligram tibdiwal या सभेला संस्थाध्यक्ष मोहन अग्रवाल, उपाध्यक्ष प्रवीण हिवरे, सचिव ज्ञानेश्वर पहाटे, कोषाध्यक्ष व्यास, संचालक शेखर शेंडे, डॉ. नारायण निकम, मधूसुदन अग्रवाल आदी उपस्थित होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0